अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड; राज्य सरकारचा हा मोठा निर्णय, एवढ्या कोटींचं पॅकेज; यांना मदत ही मिळणार?

0

यंदा राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीचं संकंट आलं. अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालं, उभी पीकं आडवी झाली, अनेक शेतकऱ्याचं शेती खरडून गेली. अनेकांच्या घरात पाणी शिरलं. अनेक शालेय विद्यार्थ्यांचं देखील नुकसान झालं. अतिवृष्टीमुळे जनावरांचा मृत्यू झाला, अनेक शेतकऱ्यांचा देखील मृत्यू झाला. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ३१ हजार ६२८ चे पॅकेज घोषित करण्यात आले आहे. यात कोणकोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे? ते बघूया……

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राज्यात अनेकठिकाणी अतिवृष्टी झाली असून, अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, अनेकांचा मृत्यू झाला. आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहणी केली, अनेकांना दिलासा दिला. १० हजारांची तातडीने मदत देणं असेल, जिवनावश्यक वस्तू म्हणजे गहू, तांदूळ अशा वस्तू दिल्या. शेतकऱ्याचं आपल्या पिकांवर प्रेम असतं. आम्ही जेव्हा पाहणी केली तेव्हा, झोपलेलं पीक पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली. जमिनीत आता रब्बी पीकं घेण्याची क्षमता देखील उरली नाही. यातून आर्थिक आणि मानसिक त्रास झाला. भविष्यात शेतकरी आणि शेती उभी राहिली पाहिजे, म्हणून त्यामुळे आम्ही कॉम्पेन्सेशन म्हणून एक पॅकेच तयार केलं आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

राज्यात मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 47 हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी 3 लाख नरेगाच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे, जवळपास हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

  • पीक नुकसानभरपाई
  • शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता आलं पाहिजे यासाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये.
  • हंगामी बागायती शेतीनुकसान भरपाई प्रति हेक्टरी 27 हजार रुपये.
  • बागायती शेती नुकसान भरपाई प्रति हेक्टरी 32 हजार रुपये.
  • विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये.
  • कोरडवाहू शेतकऱ्यांना 35 हजार.
  • बागायती शेती ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना 50 हजारांहून अधिक मदत मिळेल.
  • जनावरे आणि घरासाठीही मदतनिधी
  • दुधाळ जनावरांना प्रति जनावर 37 हजार रुपयांपर्यंत मदत.
  • गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार.
  • कुकुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी.
  • नष्ट, पडझड झालेली घरं नव्याने बांधण्यासाठी मदत.
  • डोंगरी भागातील घरांना 10 हजारांची अधिकची मदत.
  • झोपड्यांची मदत, गोठा, दुकानदार यांना 50 हजार मदत.
  • विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफ करणार
अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती