एकनाथ शिंदेंची ‘मिशन महापालिका’ स्पेशल 21 टीम तयार, शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली

0

एकराज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राज्यातील निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत, असं अनेकदा महायुतीमधील प्रमुख नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे, तर दुसरीकडे या निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचं चित्र स्पष्ट झालेलं नाहीये, त्यातच आज मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडल्यानं उत्सुकता आणखी वाढली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर महत्त्वाची बामती समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली आहे. या टीममध्ये  २१ प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 21 शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना  या समितीमध्ये संधी देण्यात आली आहे. शिवसेनेची ही मुख्य कार्यकारी समिती पुढीलप्रमाणे असेल.

शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती 

१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते २) रामदास कदम, नेते ३) गजानन कीर्तीकर, नेते

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

४) आनंदराव अडसूळ, नेते ५) मीनाताई कांबळे, नेत्या ६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

७) रवींद्र वायकर, खासदार ८) मिलिंद देवरा, राज्यसभा – खासदार ९) राहुल शेवाळे, माजी खासदार

१०) संजय निरुपम, माजी खासदार ११) प्रकाश सुर्वे, आमदार १२) अशोक पाटील, आमदार

१३) मुरजी पटेल, आमदार १४) दिलीप लांडे, आमदार १५) तुकाराम काते, आमदार

१६) मंगेश कुडाळकर, आमदार १७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार १८) सदा सरवणकर, माजी आमदार

१९) यामिनी जाधव, माजी आमदार २०) दीपक सावंत, माजी आमदार २१) शिशिर शिंदे, माजी आमदार

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा