अत्याचार करून गावी गेला, कीर्तनात दंग झाला, पण TV वर स्वत:चा फोटो पाहिला अन्…. गाडेने धूम ठोकली

0

पुणे : परगावी जाणाऱ्या एका युवतीवर पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसराच्या आवारात तेथीलच एका बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना बुधवारी समोर आली. आरोपीने क्रूर कृत्य करून लगोलग त्याचे शिरूर तालुक्यातील गुणाट हे गाव गाठले. गुन्हा घडल्यानंतर जवळपास ४० तासांहून अधिक वेळ पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र अजूनही नराधम मोकाटच आहे.

साताऱ्यातील फलटण तालुक्यातील एका गावात संबंधित तरुणी जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती. सकाळची साडे पाचची वेळ होती. गाडीची वाट पाहत असलेल्या मुलीला गोड बोलून दत्ता नामक नराधमाने फसवले आणि इतर प्रवासी झोपले असल्याचे सांगून निर्मनुष्य एसटी गाडीत बसवले. मुलगी गाडीत बसताच आरोपीने गाडीचा दरवाजा लॉक केला आणि नको ते कृत्य केले. घटनेनंतर आरोपी लगोलग पसार झाला. घटनेच्या काही तासांतच पीडितने स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्ह्यांची नोंद केली.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

बलात्कार करून घरी आला, दुपारपर्यंत निवांत, नंतर कीर्तनात सहभागी

साडे पाच वाजण्याच्या सुमारास आरोपीने तरुणीवर अतिप्रसंग करून शिरुर तालुक्यातील गुणाट गाव गाठले. दुपारपर्यंत तो घरातच होता. त्यानंतर त्याने कीर्तनातही सहभाग नोंदवला. पण टीव्हीवर जशाही बातम्या सुरू झाल्या आणि बातम्यांमधून स्वत:चा फोटो त्याने पाहिले, त्यावेळेपासून त्याने घरातून पोबारा केला.

आरोपी दत्ता गाडे हा गावातल्याच ऊसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली आहे. त्यानंतर पुणे शहर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांचे १०० जणांचे पथक गावात दाखल झाले आहे. पोलीस पथकाने ऊसाच्या शेतात दत्तासाठी शोधमोहीम राबवली. ऊसाच्या फडात बिबट्याचे वास्तव असल्याने जिथे जाता येत नाही, तिथे पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून शोधकार्य केले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

पोलिसांसोबत श्वान पथकही दत्ताचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहे. पोलिसांकडून दत्ताचा कसून शोध सुरू आहे. गुणाट गावातील संपूर्ण परिसर पोलिसांनी पालथा घातला, ऊसाच्या फडात शोधकार्य राबवले पण तरीही दत्ता पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. त्यामुळे दत्ता नेमका गेला कुठे? तो पोलिसांच्या हाती कधी लागणार? कसा लागणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

आरोपी हाताला लागत नसल्याने पोलिसांनी दत्ताचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास एक लाख रुपये इनाम देण्याची घोषणा केली आहे. गावातील नागरिक, सरपंच पुणे पोलिसांना सहकार्य करीत आहेत.

दत्ताची गुन्हेगारी कुंडली

-स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

-शिक्रापूर आणि शिरुर तालुक्यात त्याच्या नावावर गुन्हे दाखल आहेत

-महिलांना लिफ्ट देऊन त्यांचे सोन्याचे दागिने हिसकवायचा

-दत्ता सराईत गुन्हेगार होता, त्याच्या नावावर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत