बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अखेरीस पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. दोन महिन्यानंतर पोलिसांनी 1500 पानाचं हे आरोपपत्र बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात सीआयडीने दाखल केलं आहे. या आरोप पत्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सत्य समोर येणार आहे.






बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्येने महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. राज्यभर आंदोलनं झाली, संतोष देशमुख कुटुंबाने आक्रमक भूमिका घेतली. आता मात्र, या हत्येचा संपूर्ण तपशील या दोषारोप पत्रातून उलगडणार आहे. सीआयडीच्या तपासानुसार, खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा सहभाग आहे का? हे तपासातून स्पष्ट होईल. “या प्रकरणात सात आरोपींनी कशा प्रकारे कट रचला, हत्या केली आणि त्याचा गुन्हेगारी इतिहास काय आहे, यासंबंधी पुरावे चौकशीतून समोर येणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची नियुक्ती
आरोपींनी हत्येसाठी वापरलेली शस्त्रं कोणती? हल्ला कसा झाला? हत्येची वेळ आणि ठिकाण कोणतं? हेही दोषारोप पत्रातून उघड होईल. तसंच, आरोपी फरार होण्यात कोणाच्या मदतीने यशस्वी झाले आणि त्यानंतर ते कुठे लपलं होतं? याचाही तपास करण्यात आला आहे. याशिवाय, कुठल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला? याचाही तपास सीआयडीने केला आहे. याच प्रकरणाशी संबंधित खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांमध्ये काही संबंध आहे का? याचाही तपास करण्यात आला आहे.
डिजिटल पुराव्यांमधून (CDR डेटा) कोणाशी संपर्क झाला? वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेच्या संघटित गुन्हेगारीतील आणखी काही बाबीसमोर येणार का? आरोपींनी खंडणीमधून मिळवलेल्या संपत्तीचा तपास कोणत्या टप्प्यावर आहे? “आम्हाला न्याय हवा! हा गुन्हा फक्त एका व्यक्तीने नाही, तर एका मोठ्या टोळीने केला आहे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.”
संतोष देशमुख हत्या प्रकरण दोषारोप पत्रातील ठळक बाबी
1. बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात CID ने 1500 पानी दोषारोप पत्र दाखल केले.
दोषारोप पत्रातून हत्येच्या कटाचे सत्य समोर येण्याची शक्यता.
हत्येचा मूळ कारण आणि गुन्हेगारी कनेक्शन स्पष्ट होणार
2. संतोष देशमुख यांची हत्या – कारण आणि पद्धत
खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळे हत्या केल्याचा आरोप.
अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली याचे तपशील.
हत्येसाठी वापरलेली शस्त्रे आणि गुन्ह्याची पद्धत समोर येणार.
3. हत्येचा कट आणि आरोपींचा सहभाग
सात आरोपींनी कट कसा रचला आणि अंमलात आणला याचे पुरावे.
आरोपींच्या सहभागासंदर्भातील डिजिटल पुरावे आणि सीडीआर.
हत्याकांडामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे याचा तपास.
4. वाल्मीक कराड आणि इतर आरोपींची भूमिका
वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेचा हत्येत सहभाग आहे का?
खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या प्रकरण यांचा परस्पर संबंध
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेच्या संघटित गुन्हेगारीचा तपास
5. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी व सहकारी
आरोपींनी फरार होण्यासाठी कोणी मदत केली?
आरोपी फरार झाल्यानंतर कुठे होते आणि त्यांनी काय केले?
आरोपींनी याआधी कोणते गुन्हे केले याची माहिती
6. पोलीस प्रशासनातील भूमिकेची चौकशी
पोलीस अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली का?
CID च्या तपासातून पोलिसांची भूमिका दोषी ठरणार का?
7. खंडणी प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार
वाल्मिक कराडने खंडणीतून मिळवलेल्या संपत्तीचा तपास
आर्थिक व्यवहार, जमिनीच्या खरेदी-विक्रीचा शोध.
8. आरोपींच्या संघटित गुन्हेगारीचे प्रकार
हत्येशिवाय अन्य गुन्हेगारी कृत्ये घडली होती का?
आरोपींनी अन्य कोणते मोठे गुन्हे केले आहेत याचा शोध
हे सर्व मुद्दे दोषारोपपत्राच्या माध्यमातून समोर येण्याची शक्यता आहे











