विराट कोहली याची बॉर्डर गावसकर ट्रॉफीआधी मोठी घोषणा, नक्की काय?

0
1

टीम इंडियाला मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध 3-0 ने व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. भारताला पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉशने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका (बॉर्डर गावस्कर ट्रॉफी) खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने सोशल मीडियावरुन मोठी घोषणा केली आहे. विराटने एक्स या सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवरुन सर्वांसोबत काय शेअर केलंय? हे जाणून घेऊयात.

विराटने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीआधी टीम बदलली आहे. विराटनेच ही घोषणा केली आहे. विराटला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे विराटवर सडकून टीका करण्यात आली होती. त्यानंतर विराटने ही घोषणा केली आहे. विराटने गुरुवारी 7 नोव्हेंरबरला सोशल मीडियावरुन पोस्ट करत मॅनेजमेंट टीमससोबत नवी सुरुवात करत असल्याचं सांगितलं आहे. विराटने बिझनेससाठी स्पोर्टिंग बियॉन्डसह जोडल्याचं म्हटलं आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

विराटने पोस्टमध्ये काय म्हटलं?

“मी माझी टीम ‘स्पोर्टिंग बियॉन्ड’सोबत नव्या सुरुवातीची घोषणा करताना उत्साहित आहे. ही कंपनी गेल्या काही काळापासून माझ्यासह कार्यरत आहे. स्पोर्टिंग बियॉन्ड टीम माझी उद्दिष्टं, पारदर्शकतेची माझी मूल्यं, प्रामाणिकपणा आणि खेळावरील प्रेम या मूल्यांना सामायिक करते. माझ्यासाठी हा एक नवा अध्याय आहे, कारण मी माझ्या नव्या टीमसोबत भागीदारीची प्रतिक्षा करतोय, जे माझ्या सर्व व्यावसायिक हितसंबंधांवर माझ्यासोबत काम करेल”, असं विराटने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय.