पिंपरीच्या हायफाय एरियातील वाल्मिक कराडच्या अलिशान फ्लॅटचा लिलाव होणार, दीड लाखांचा कर थकवल्यामुळे कारवाई

0
4

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडच्या नावे अनेक ठिकाणी मालमत्ता समोर येत आहेत. त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावे, ड्रायव्हरच्या नावे अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून काही दिवसांपुर्वी करण्यात आला होता. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडच्या या अलिशान फ्लॅटचा लवकरच लिलाव होणार असल्याची माहिती आहे.

पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराडचा फ्लॅट सील केला जाणार आहे, मग त्याचा लिलाव ही केला जाईल. 16 जून 2021ला वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे या फ्लॅटची नोंदणी झालेली आहे. मात्र तेव्हापासून वाल्मिक कराडने मिळकत कर थकवला आहे. 1 लाख 55 हजार 444 रुपयांचा हा मिळकत कर थकवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने वाल्मिक कराडला नोटीस धाडली आहे. 21 नोव्हेंबर 2024ला धाडलेल्या नोटिशीनंतर ही कर न भरल्यानं आता हा फ्लॅट सील केला जाईल आणि त्यानंतर त्याचा लिलाव ही करण्यात येईल अशी माहिती आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

कर संकलन विभागाचे प्रमुख अविनाश शिंदेंनी याबाबत एबीपी माझाशी बोलताना सांगितलं, चालू वर्षाच्या मिळकत कर संबंधीचा बिल आपण यापूर्वीच त्यांना बजावलेलं आहे, आणि मिळकत कराच्या बरोबरच त्यांची एक लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यांना आपण जप्तीपूर्वीची नोटीस देखील दिलेली आहे, त्यांच्याकडे साधारण एक लाख 55 हजार 444 इतकी थकबाकी आहे. त्याप्रमाणे त्यांना 21 नोव्हेंबर 2024 रोजी जप्ती अधिपत्र देखील दिलेले आहे. साधारणपणे महानगरपालिकेकडे 16 जून 2021 रोजी या मालमत्ताधारकांची नोंद झाल्याचे दिसून येते, आणि तेव्हापासून त्यांच्याकडे मालमत्ता करत हा थकीत असलेल्या दिसून येतो अशी माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख अविनाश शिंदेंनी दिली आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

पुढे बोलताना कर संकलन विभागाचे प्रमुख अविनाश शिंदे म्हणाले, सदरच्या मालमत्ता धारकाला आपण जप्ती अधिपत्र बजावण्यात आलेला आहे. त्यांना 21 दिवसाचा पिरेड दिलेला आहे. 21 दिवसाचा पण पिरेड संपलेला आहे. आपण वारंवार मालमत्ताधारकांना फोनद्वारे एसएमएसद्वारे आवाहन करतो की, जर आपली मालमत्तेची थकबाकी असेल तर दिलेल्या तारखेपर्यंत ती महानगरपालिकडे आपण जमा करावी. याप्रमाणे यांना सुद्धा आवाहन करण्यात आलेले आणि आवाहन करून जर त्यांनी कर भरला नाही, तर सदरची मालमत्ता सील करण्यात येईल, त्यानंतर त्याच्या पुढची लिलावाची पुढच्या प्रक्रियेत सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली आहे.

पिंपरी चिंचवडच्या हायफाय सोसायटीत 4 BHK फ्लॅट

पुण्यानंतर वाल्मिक कराडने पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलं आहे. वाल्मिक बाबुराव कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावाने हा फ्लॅट आहे. काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयवरी इमारतीत हा फोर बीएचके फ्लॅट आहे, ज्याची आजच्या बाजार भावानुसार हा फ्लॅट साडे तीन कोटींच्या किमत आहे. सध्या इथं कोणी राहत नसल्याची माहिती आहे, मात्र मिळकत कर थकवल्याप्रकरणी महापालिकेने फ्लॅटच्या बाहेर नोटीस चिटकवली आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराडची प्रॉपर्टी

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत वाल्मिक कराड आणि टोळीने 25 कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा करण्यात येतोय. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर काम सुरु असलेल्या असलेल्या एका इमारतीत वाल्मिक कराड, त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावे सहा ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आल्या आहेत.पंचवीस कोटी रुपये मोजून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने या इमारतीत या ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यासाठी बिल्डरसोबत करार केल्याचं समोर आलं आहे.