तब्बल 49 वर्षांनंतर ‘शोले’ चित्रपटातून हटवलेला ‘तो’ सीन व्हायरल

0

बॉलिवूडचा क्लासिक चित्रपट ‘शोले’ १९७५ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यासारख्या दिग्गज कलाकारांची यात महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटाची कथा सलीम-जावेद यांनी लिहिली होती. ‘शोले’च्या शूटिंगदरम्यानचे अनेक किस्से खूप प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये धर्मेंद्र यांनी खऱ्या बंदुकीचा वापर केल्याचे ही सांगण्यात आले आहे. मात्र ४९ वर्षांपूर्वी बनलेल्या या चित्रपटाचे अजूनही असे काही सीन आहेत, ते प्रेक्षकांना माहितीच नाहीय. नुकताच या चित्रपटातील एका सीनचा फोटो व्हायरल होत आहे, जो ‘शोले’मधून डिलीट करण्यात आला होता.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अमजद खानने साकारलेल्या या चित्रपटातील गब्बरच्या व्यक्तिरेखेबद्दलही अनेक किस्से होते. मात्र या चित्रपटात हे पात्र इतकं भयाण दाखवण्यात आले आहे की, त्यातील अनेक सीन कापण्यात आले. नुकताच या चित्रपटाच्या डिलीट केलेल्या सीनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात गब्बर दरोडेखोरांमधील एका व्यक्तीला मारताना दिसत आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होताना सेन्सॉर बोर्डाने हा सीन पाहिल्यानंतर ते डिलीट करण्यास सांगितले. या सीनमध्ये खूप हिंसा दाखवण्यात आली आहे, असे सेन्सॉर बोर्डाने सांगत यावर कात्री लावली होती.

सचिन पिळगावकर आणि अमजद खान यांचा फोटो चर्चेत
ओल्ड इज गोल्ड नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा डिलीट केलेला सीन शेअर करण्यात आला आहे. या सीनमध्ये सचिन पिळगावकर आणि अमजद खान दिसत आहेत. या फोटोमध्ये अमजद खान हे सचिन यांचे क्रूरपणे केस ओढताना दिसत आहेत. त्यांच्या शेजारी दरोडेखोरांची टोळी उभी आहे. हा फोटो पाहिल्यानंतर लोकांनी त्यावर कमेंट करत डिलीट केलेल्या सर्व सीनसह हा चित्रपट प्रदर्शित करण्याची चर्चा केली. हा चित्रपट 2024 मध्ये पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

डॅनी दिग्दर्शकाची पहिली पसंती
रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटात गब्बरच्या भूमिकेसाठी याआधी डॅनीचं नाव समोर आलं होतं, मात्र तारखेच्या अडचणींमुळे तो ही भूमिका साकारू शकला नाही. पण ही व्यक्तिरेखा इतकी रंजक होती की, अमिताभ बच्चन यांनीही ती साकारण्याचा खूप प्रयत्न केला. बरं डॅनीचं नाव हटवताच कुणीतरी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अमजद खानचं नाव सांगितलं. त्यानंतर या भूमिकेसाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.