पोलिसांचं डाॅ. वायबसेला हे ‘इंजेक्शन’ दिलं अन् ‘वाँटेड’ घुले अन् सांगळेसाठी बालेवाडी स्टेडिअम असा लागला सापळा

0
2

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य ‘वाँटेड’ आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला पुण्यातून अटक करण्यात आली. पुण्यातील बालेवाडी स्टेडिअम जवळील एका खोलीतून या दोघा ‘वाँटेड’ आरोपींना ताब्यात घेतले. मात्र तिसरा कृष्णा आंधळे हा निसटला.

घुले, सांगळे आणि आंधळे या तिघांच्या तिथल्या संशयित हालचालींची टीप अन् त्यांना मदत करणाऱ्या डाॅ. संभाजी वायबसेंकडून दुजोरा मिळताच बीड पोलिसांनी पहाटे चार वाजता छापा घालून या दोघा ‘वाँटेड’ आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींना आज दुपारी केज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येमधील मुख्य ‘वाँटेड’ सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक करण्यात बीड पोलिसांना मोठे यश आले. या दोघांना पुण्यातून अटक झाली आहे. घुले आणि सांगळे या दोघांना अटक करण्यापूर्वी बीड पोलिसांनी डाॅ. संभाजी वायबसे याला नांदेड येथून ताब्यात घेतलं होते. डाॅ. वायबसे हा देखील पसार होता. देशमुख यांची हत्या झाल्यानंतर डाॅ. वायबसे हा वकील पत्नीसह पसार झाला होता. ते नांदेडमध्ये दडून बसला होता.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

या काळात तो ‘वाँटेड’ घुले, सांगळे आणि आंधळे यांच्या संपर्कात असल्याची माहिती बीड पोलिसांच्या तपासात समोर आली. तसेच यांना पैसे देखील दिले होते. डाॅ. वायबसे, त्याची वकील पत्नी आणि आणखी एक जण, असे तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत डाॅ. वायबसे पोपटासारखा बोलला. यानंतर काही तासातच ‘वाँटेड’ घुले आणि सांगळे याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. आता या गुन्ह्यात एकच ‘वाँटेड’ आरोपी कृष्णा आंधळे पसार आहे. त्याचाही शोध पथक घेत आहे.

घुले आणि सांगळे पुण्यातील बालेवाडी स्टेडिअमजवळील एका खोलीत राहत होते. त्यांच्या हालचाली संशयित होत्या. याची टीप एकाने पोलिसांना दिली. यातच डाॅ. संभाजी वायबसे याच्याकडून देखील मिळालेल्या माहितीची तांत्रिक तपासणी केली. माहिती तथ्य आढळल्याने बीड पोलिसांनी पहाटे बालेवाडी स्टेडिअमजवळ फिल्डिंग लावली. घुले आणि सांगळेच असल्याचे खात्री पडताच, सापळा आवळला अन् त्या दोघांना ताब्यात घेतले. परंतु आंधळे हा निघून गेल्याने तो सापडला नाही. त्याच्या मागावर पथक आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

एकूण आरोपी किती?

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी आहेत. विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार या चार आरोपींना याअगोदरच अटक केली आहे. यानंतर आज सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक केली आहे. कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे. घुले, सांगळे आणि आंधळे यांना पसार होण्यास मदत करणारा डाॅ. संभाजी वायबसे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतून सिद्धार्थ सोनवणे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देशमुख यांची टीप यानेच दिल्याचे तपासात पुढे येत आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या!