महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये 48 लोकसभा मतदारसंघात झालेल्या 5 टप्यातील मतदानानंतर पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेने मतदारांचे मत आजमावून घेतले. या यामध्ये मतदानोत्तर चाचणी (एक्झिट पोल)चे निष्कर्ष आलेले आहेत त्यानुसार संभाव्य विजयी राजकीय पक्ष व उमेदवार यांचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.






पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या मतदानोत्तर सर्वेक्षण चाचणी (एक्झिट पोल) नुसार राज्यात सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असून महायुतीचाच प्रभाव या निवडणुकीत राहणार आहे असा अंदाज निष्कर्षातून व्यक्त होत आहे.
प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांचे प्रमाण-
भाजप-29.74%
शिवसेना-16.43%
राष्ट्रवादी-8.31%
कॉंग्रेस-16.34%
शिवसेना (उबाटा)-9.37%
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)-7.54%
अन्य पक्ष, अपक्ष व नोटासह 12.27% असे संभाव्य मतांचे प्रमाण राहील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये संभाव्य विजयी राजकीय पक्षांमध्ये
भाजप-23
शिवसेना-11
शिवसेना (उबाठा)-6
कॉंग्रेस-3
राष्ट्रवादी-2
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)-2
एमआयएम-1 याप्रमाणे संख्याबळ राहू शकते.
राज्यातील प्रमुखयुती व आघाडीनुसार महायुतीला एकूण 36 जागांवर यश मिळेल तर महाविकास आघाडीला 11 जागांवर संभाव्य यश मिळू शकते तर अन्य एका जागी इतर पक्षाला 1 जागा मिळण्याची शक्यता मतदानोत्तर सर्वेक्षण चाचणी (एक्झिट पोल) नुसार व्यक्त होत आहे.
निवडणुकीतील सामना पाहिल्यास भाजप 28 पैकी 15 लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवारांशी लढत झालेली असून 8 मतदारसंघात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) या पक्षाशी लढत झाली असून 5 लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) या पक्षाशी प्रामुख्याने लढत झालेली आहे. शिवसेना (शिंदे) या पक्षाच्या एकूण 15 पैकी 13 जागांवर थेट शिवसेना (उबाठा) पक्षाशी लढती पहावयास मिळाल्या आहेत यामध्ये निकालांनंतर खरी शिवसेना कोणाची हे स्पष्ट होणार आहे. तर उर्वरित अन्य 2 जागांवर कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांशी लढत झालेली आहे. तसेच राष्ट्रवादी (अजित दादा) पक्षांच्या 5 पैकी 2 जागांवर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाशी थेट लढती झाल्या. यामध्ये बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर अन्य 2 जागांवर शिवसेना (उबाठा) पक्षाशी लढती झालेल्या असून उर्वरित रासपला सोडलेल्या जागेवर देखील शिवसेना (उबाठा) पक्षाशी लढती झालेली आहे.











