कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाची “जागतिक तंबाखू विरोधी निषेध दिन” जनजागृती मोहिम..!

0

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने “३१ मे जागतिक तंबाखू विरोधी निषेध दिन” जनजागृती मोहीम राबवण्यात आली. मोहिम राबविण्याच मुख्य उद्दिष्ट म्हणजे “जागतिक तंबाखू विरोधी दिन २०२४ ची थीम “तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण ” आहे. भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण करणे आणि तंबाखूच्या सेवनात सतत घट होणे सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. सदर मोहिम प्रभाग क्रमांक १०,११,१२, या तीनही प्रभागातील सर्व आरोग्य कोठयां अंतर्गत असलेल्या पान विक्री केंद्रावर जाऊन पान, तंबाखू, गुटखा, खाणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे पुष्प देऊन विशेष सत्कार करून पान, तंबाखू, गुटखा खाऊ नका, आपले आरोग्य धोक्यात आणून नका असे नम्रपूर्वक सांगण्यात आले. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व धुम्रपान करणाऱ्या ५ नागरिकांना गांधीगिरीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करून ५०००/- रुपये शुल्कही वसूल करण्यात आले.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

सदर जनजागृती मोहिम गेली १७ वर्षापासून साततत्त्यायाने राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे पान विक्री दुकानदारांना थुंकणाऱ्या नागरिकांना थुंकण्यासाठी थुंकी पात्र व कचरा टाकण्यासाठी स्वंतत्र डब्बे ठेवण्याच्या सक्त सूचनाही देण्यात आल्या. तसेच प्रत्येक पानविक्री मालकास “कचरा रस्त्यावर फेकू नका, कचरा समोरच्या डब्ब्यात टाका, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका थुंकल्यास प्रत्येकी १०००/- रुपये दंडात्मक कारवाई होईल, १७ वर्षाच्या आतील मुलांना पान, गुटखा, तंबाखू व सिगारेटची विक्री करू नका असे फलकही लावण्याच्या सूचनाही दिल्या. शिवाय शाळा, महाविद्यालय, खाजगी शालेय शिकवण्याच्या आवारातील ५०० मिटर अंतरावर पान विक्री करू नये असेही सांगण्यात आले.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

व्यसन करणाऱ्या नागरिकांना पान, गुटखा, तंबाखु व विडी सिगारेट इत्यादींचे सेवन केल्यानंतर आरोग्यावर किती वाईट परिणाम होतात याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर मोहिम घनकचरा व्यवस्थापक संदीप कदम व उपायुक्त गणेश सोनुणे, महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली, आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, गणेश साठे, गणेश चोंधे, लक्ष्मीकांत कुलकर्णी यांच्या निरिक्षणाखाली, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी सेवक परेश कुचेकर, अमोल कांबळे, संदिप अडसुळ, भुकूम गायकवाड, स्वच्छ संस्थेच्या करूणा सोनवणे यांनी जनजागृती मोहिमेत यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव