महायुती शिंदे, फडणवीस अन् अजित पवारांना धक्का; महाविकास आघाडी ठाकरे, पवार, पटोले ठरणार ‘किंग’

0

शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात मोठी निवडणूक पार पडली. अटीतटीची झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची प्रतिष्ठा पणाली लागली होती.

या निवडणुकीत महायुतीला धक्का बसल्याचं दिसून येत आहे. तर, महाविकास आघाडीनं चांगली आघाडी घेतली आहे. राज्यात महाविकास आघाडीला 22 ते 25 जागा तर महायुतीला 22 ते 26 जागा मिळण्याचा अंदाला ‘एबीपी सी व्होटर’नं व्यक्त केला आहे. टीव्ही 9 पोलस्ट्राट च्या एक्झिट पोलनुसार महायुती पिछाडीवर दिसत आहे. टीव्ही 9 पोलस्ट्राट’च्या पोलनुसार महाविकास आघाडीला 25 तर महायुतीला 22 जागा मिळत आहेत. तर, अपक्षला 1जागा दाखवत आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

एपीबी सी व्होटर

महायुती –

भाजप-17 शिंदे गट-6 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- 1

महाविकास आघाडी

शिवसेना (ठाकरे गट)-9 कोंग्रेस-8 राष्ट्रवादी (शरद पवार गट)-6 अपक्ष-1

कोणी किती जागा लढल्या?

भाजप – 28. शिंदे गट-15 अजित पवार- 4 (जानकर-1)

उद्धव ठाकरे – 21 कॉग्रेस-17 शरद पवार – 10