देशात पुन्हा भारतीय जनता पक्षाचे राज्य येण्यासाठी अनुकूल वातावरण असले तरीसुद्धा महाराष्ट्र मधून मात्र भारतीय जनता पक्षाच्या रणनीतीला फार मोठा धक्का बसण्याची शक्यता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून येत आहे. प्रचारात फिरणारे लोक आणि प्रत्यक्ष मतदानामध्ये त्याच लोकांसह मतदारांनी घेतलेली भूमिका यामुळे राज्यातील लोकसभा निवडणुकीचे निकाल प्रचंड धक्कादायक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व घडामोडी मध्ये अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अतोनात हानी झाली असली तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पदरामध्ये फारसं अपयश न आल्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्षाच्या वतीने या निकालाकडे आशादायी पद्धतीने पाहिलं जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये भूतं नो भविष्य अशा राजकीय घडामोडी घडल्या त्यानंतर मतदारांना व्यक्त होण्यासाठी कोणतीही संधी नव्हती ती थेट लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली वरवर सर्वजण चांगलं बोलत असलं तरी सर्वसामान्य मतदार मात्र या पाच वर्षाच्या काळात घडामोडीमुळे प्रचंड त्रस्त आहे. मागील पाच वर्षांमध्ये राज्यामध्ये कोणतीही समाधानकारक घटना घडली नाही सर्व स्तरावर निर्माण झालेले अराजकता यामुळे महाराष्ट्रातील मतदारांचा लोकसभा निवडणुकीमध्ये धक्कादायक कौल लक्षात येत आहे. मुळातच महाराष्ट्र ही कट्टरवादी विचारांना थरांना देणारी भूमी असल्यामुळे विशिष्ट विचारांच्या लोकांकडे कल असतानाही एकदम टोकाची भूमिका महाराष्ट्राने आजतागायत घेतली नाही त्यामुळेच की काय प्रचारामध्ये महाविकास आघाडीच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आणि महायुती सभांसाठी करावी लागणारी कसरत यामध्येच लोकांचा कौल लक्षात येत होता. महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये 48 लोकसभा मतदारसंघात झालेल्या 5 टप्यातील मतदानानंतर
न्यूजमेकर.लाईव्ह च्या सर्वेक्षण चाचणी (एक्झिट पोल) नुसार राज्यात सर्वाधिक जागा ठाकरे यांना सर्वाधिक राहणार आहे असा अंदाज निष्कर्षातून व्यक्त होत आहे.
विदर्भ. मविआ- 7 महायुती-3
मराठवाडा मविआ-6 महायुती-2
उत्तर महाराष्ट्र मविआ-4 महायुती-4
पश्चिम महाराष्ट्र मविआ- 8 महायुती-0 इतर 1
कोकण मविआ-2 महायुती-0
मुंबई मविआ-7 महायुती-4
……………….,…………………………………..
एकूण मविआ 34 महायुती 13 इतर 1
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 2024च्या राज्यातील सर्व 48 लोकसभा जागांवर 1121 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मागील निवडणुकीच्या तुलनेत 254उमेदवार या निवडणुकीत अधिक आहेत.
महाराष्ट्र विभागानुसार लोकसभा 2024 संभाव्य आघाडीवरील उमेदवार
मुंबई मविआ-7 महायुती-4
ई.मुंबई संजय दिना पाटील शिवसेना(ठाकरे गट)
उ पश्चिम मुंबई अमोल कीर्तिकर शिवसेना (ठाकरे गट)
दक्षिण मुंबई अरविंद सावंत शिवसेना (ठाकरे गट)
ठाणे राजन विचारे शिवसेना (ठाकरे गट)
पालघर भारत कामडी (ठाकरे गट)
द मध्य मुंबई राहुल शेवाळे शिवसेना (शिंदे गट)
कल्याण श्रीकांत शिंदे शिवेसना (शिंदे गट)
भिवंडी कपिल पाटील (भाजप)
उत्तर मुंबई पियूष गोयल (भाजप)
उ-मध्य मुंबई वर्षा गायकवाड (काँग्रेस)
कोकण मविआ-2 महायुती-0
रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत शिवेसना (ठाकरे)
रायगड अनंत गिते शिवेसना (ठाकरे गट)
पश्चिम महाराष्ट्र मविआ- 8 महायुती-0 इतर 2
कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस)
सोलापूर प्रणिती शिंदे (काँग्रेस)
पुणे रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
सातारा शशिकांत शिंदे राष्ट्रवादी (शरद पवार)
माढा धैर्यशील मोहिते राष्ट्रवादी (शरद पवार)
बारामती सुप्रिया सुळे राष्ट्रवादी (शरद पवार)
शिरूर अमोल कोल्हे राष्ट्रवादी (शरद पवार)
मावळ संजोग वाघेरे शिवसेना (ठाकरे गट)
सांगली विशाल पाटील (अपक्ष)
हातकणंगले राजू शेट्टी (स्वाभिमानी)
उत्तर महाराष्ट्र मविआ-4 महायुती-4
नगर – निलेश लंके – राष्ट्रवादी (शरद पवार)
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना (ठाकरे गट)
नाशिक- राजाभाऊ वाजे शिवसेना (ठाकरे गट)
नंदुरबार गोवाल पाडवी शिवसेना (ठाकरे गट)
जळगाव श्रीमती स्मिता वाघ,(भाजप)
दिंडोरी भारती पवार (भाजप)
धुळे – सुभाष भामरे (भाजप)
रावेर – रक्षा खडसे (भाजप)
मराठवाडा मविआ-6 महायुती-2
परभणी- संजय जाधव (ठाकरे गट)
औरंगाबाद चंद्रकांत खैरे शिवसेना (ठाकरे गट)
धाराशिव- ओमराजे निंबाळकर शिवसेना (ठाकरे)
हिंगोली – नागेश आष्टीकर शिवसेना (ठाकरे गट)
लातूर – सुधाकर श्रृंगारे (भाजप)
जालना – रावसाहेब दानवे (भाजप)
नांदेड – वसंतराव चव्हाण(काँग्रेस)
बीड – बजरंग सोनावणे – राष्ट्रवादी (शरद पवार)
विदर्भ. मविआ- 7 महायुती-3
अमरावती- वळवंत वानखेडे (काँग्रेस)
अकोला – अभय पाटील – (काँग्रेस)
चंद्रपूर प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
गड चिमूर डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस)
रामटेक – श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)
नागपूर – नितीन गडकरी(भाजप)
वर्धा – रामदास तडस (भाजप)
भं. गोंदिया सुनील मेंढे (भाजपा)
बुलडाणा नरेंद्र खेडेकर शिवसेना (ठाकरे गट)
यवतमाळ – संजय देशमुख शिवसेना (ठाकरे गट)