देशात सध्या निवडणुकीची वारे सुरू आहे मुख्य निवडणूक आयुक्तांनी अजून आचारसंहिता लागू करण्याची पत्रकार परिषदेही घेतली नाही किंवा तारीखही जाहीर केली नाही. उद्या दुपारी निवडणूक आयोगाची अधिकृत पत्रकार परिषद होणार आहे त्यानंतर देशांमध्ये आचारसंहिता कशी लागू होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु कोथरूड भागांमध्ये पुणे महानगरपालिकेने मात्र आचारसंहीतेची अंमलबजावणी करण्याचे अतितत्परता दाखवली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे फलक मात्र सताड उघडे आहेत.






कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरामध्ये सध्या आचारसंहितेची अंमलबजावणी म्हणून स्थानिक नगरसेवकांच्या नावावरती पट्ट्या लावण्याचे काम सुरू करण्यात आले असून यामध्ये अगोदर विरोधकांचे फलक झाकण्याला प्राधान्य देण्यात आल्यामुळे परिसरात वेगळी चर्चा सुरू झालेली आहे.
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 12 मध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन नगरसेवक व शिवसेना (उबाठा) या गटाचा एक नगरसेवक प्रतिनिधित्व करत आहे. आजच्या तारखेला देशात कुठेही आचारसंहिता लागू नसताना कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालया मार्फत मात्र आचारसंहितेची तात्काळ कार्यवाही करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. खरे तर आचारसंहिता कधी लागेल यावर उमेदवार चर्चा करत असताना कोथरूड भागामध्ये फक्त विरोधकांचे फलक झाकण्यात आल्यामुळे आचारसहिता की विरोधकांची कोंडी अशी हलकीफुलकी चर्चा परिसरात सुरू आहे.
याबाबत सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी संबंधीत प्रकरणाची माहिती घेऊ अशी तोकडी प्रतिक्रिया दिली.











