प्रदीप कुरुलकर हनीट्रॅप केसमध्ये मोठी अपडेट; एवढ्या पानांची चार्जशीट पुणे न्यायालयात दाखल

0

हनीट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपात अटकेत असलेले डीआरडीओचे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात दहशतवादी विरोधी पथकाने 2 हजार पानांचे चार्जशीट पुणे न्यायालयात दाखल केलं आहे.

काय आहे प्रकरण?

डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हे सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी तरुणी झारा दास गुत्ता हिच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. त्यांना देशभरातील संरक्षण दलाची माहिती पुरवल्या प्रकरणी एटीएसने त्यांना 3 मे ला अटक केली होती. दरम्यान डिआरडीओचे संचालक प्रदीप कुरलकर यांनी देशातील महत्त्वाची माहिती शत्रू राष्ट्राला पुरविल्याप्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

संचालक प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात दहशतवादी विरोधी पथकाने तब्बल 2 हजार पानाचे चार्जशीट न्यायालयात सादर केले आहे. आरोपी प्रदीप कुरुलकर हे मोबाईल, लॅपटॉप आणि सोशल मीडियाच्या इतर माध्यमातून आरोपी झारादास गुप्ता हिच्यासोबत अश्लील चाळे करत संपर्कात आले होते. दरम्यान आरोपी प्रदीप कुरुलकर यांनी आपला मोबाईल फोन बंद केल्यानंतर पाकिस्तानी तरुणी झारा दास गुप्ता हिने लष्करी अधिकारी शेंडेमार्फत कुरुलकर यांच्याशी संपर्क साधला होता. देशातील आणखीन काही वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानी तरुणी झारा दास गुप्ताच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती असून एटीएस त्या पद्धतीने तपास करत आहे. या गुन्ह्यात तांत्रिक पुरावा आणि खटल्याची साक्षीदार या गुन्ह्यात आता महत्त्वाचे ठरणार आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

कोण आहेत प्रदीप कुरुलकर?

शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे संरक्षण क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) संशोधन आणि विकास आस्थापनेच्या प्रतिष्ठित प्रणाली अभियांत्रिकी प्रयोगशाळेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रदीप कुरुलकर यांचे क्षेपणास्त्र क्षेत्रात भरीव योगदान आहे.

क्षेपणास्त्र प्रक्षेपक, लष्करी अभियांत्रिकी गियर, अत्याधुनिक रोबोटिक्स आणि लष्करी अनुप्रयोगांसाठी मोबाइल मानवरहित प्रणालीची रचना आणि विकास यामध्ये कुरुलकर यांचे कौशल्य आहे. कुरुलकर यांनी एक टीम लीडर आणि लीड डिझायनर म्हणून अनेक लष्करी अभियांत्रिकी प्रणाली आणि उपकरणे डिझाइन, विकास आणि वितरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन