पुण्यात तडीपारी फक्त नावालाच? २८९ पैकी केली २६७ जणांकडून तडीपारी आदेशाचा भंग धक्कादायक आकडेवारी समोर, जाणून घ्या

0
11

एखाद्या भागातील गुंडांची दहशत संपविण्यासाठी पोलिसांकडून संबंधितांवर तडीपारीची कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई नावालाच होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी गेल्या वर्षी (२०२४मध्ये) २८९ गुंडावर तडीपारीची कारवाई केली. तरीही त्यातील बहुसंख्य गुंडांचा पुन्हा शहरात वावर असल्याचे दिसून आले आहे. तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या २६७ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

वाहनांची तोडफोड, दोन गटांमध्ये हाणामारी, धारदार हत्यारे हवेत फिरवत रस्त्याने जाणे, अशा प्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. ही दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून विविध प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. त्यानंतरही गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसलेला नाही. शहरात तडीपार गुंडांकडून जबरी चोरी, घरफोडी, खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे केल्याचे शहरात घडलेल्या काही घटनांत आढळून आले आहे. तडीपारीची कारवाई झालेले गुंड पुन्हा शहरात येऊन दहशत माजवित आहेत.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

तडीपार केल्यानंतर संबंधित गुंडावर नंतर नजर ठेवली जाते का, तो पुन्हा शहरात येऊन गुन्हा करतो, तोपर्यंत पोलिसांना याची खबर का लागल नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पुणे शहरातल अलीकडील काळात कोयते नाचवणे, किरकोळ कारणावरून मारहाण करणे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. सराईत गुंडांवरील कारवाईनंतरही या घटना घडत असल्याचे चित्र आहे.

  • बिबवेवाडीतील तडीपार गुंड आणि एका सराईत गुन्हेगाराची कोंढव्यात बैठक झाली. या वेळी चुकून पिस्तुलातून गोळी झाडली गेली. सराईत गुंड यात जखमी झाला.
  • ताडीवाला रस्ता पोलिस चौकीच्या परिसरात एका तडीपार गुन्हेगाराचा मुक्त वावर होता. त्याने तरुणांवर कोयत्याने वार केले होते.
  • शहर आणि जिल्ह्यातून तडीपार असताना पुन्हा शहरात आलेल्या दोन गुंडांना येरवडा व वारजे येथे पकडले गेले.
  • हडपसर व मुंढव्यातील दोन तडीपारांना पकडून त्यांच्याकडून पिस्तुले जप्त केली गेली.
  • एका तडीपार गुंडाने वारजे येथे किराणा दुकानदाराला धमकावून खंडणी मागितली.
  • प्रवाशांना लुटल्याप्रकरणी लष्कर पोलिसांनी तडीपार गुंडासह साथीदारांना पकडले.
  • कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एका वेळी सहा तडीपार गुन्हेगारांना पकडले.
अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे