शरद पवारांचा अध्यक्षपद राजीनामा अखेर मागे; अजित पवार गैरहजरी वर; शरद पवार म्हणाले…

0

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्यांचा पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा अखेर मागे घेतला आहे.

पवार काय म्हणाले?

मुंबईतील वाय बी सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आपण राजीनामा मागे घेत असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केलं. मात्र यावेळी अजित पवार मात्र अनुपस्थित राहील्याचे दिसून आले. या पत्रकार परिषदेत अजित पवार उपस्थित राहीले नाहीत यावरून विचारलेल्या प्रश्नाल शरद पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, सगळे पत्रकार परिषदला असतात का?

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मात्र शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या सोनिया दुहान आणि आमदार संग्राम जगताप ही युवा ब्रिगेड शरद पवारांच्या अगदी मागे बसल्याचं पाहायला मिळालं.

मात्र अजित पवारांच्या या पत्रकार परिषदेतील अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान राजीनामा मागे घेताना शरद पवार म्हणाले की, मी सर्वाचा विचार करून मी पुन्हा अध्यक्ष पदी राहावे या निर्णयाचा मान ठेवत निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.

यापुढे पक्ष वाढीसाठी तसेच पक्षाचे विचारधारा ध्येय धोरणे जन माणसात पोहचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करेन असे अश्वासन शरद पवारांनी यावेळ देशभरातील कार्यकर्त्यांना दिले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन