प्रतीक्षा संपली; भारतीय हवामान विभागाकडून घोषणा, मान्सून केरळमध्ये दाखल

0
rain flows down from a roof down

मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. ज्याची आपण सगळे वाट पाहत आहे त्या मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे.

केरळमध्ये यंदा मान्सून चार दिवस उशिरा येऊ शकतो, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले होते. मात्र, जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला आहे. दक्षिणेकडील राज्यात मान्सून सुरु होण्याची सामान्य तारीख 1 जून असते. परंतु यंदा मान्सूनचा हंगाम 4 जूनपासून सुरु होण्याची अपेक्षा आहे. मात्र, आज मान्सून दाखल झालाय. दरम्यान, तळकोकणात 16 जूननंतर दाखल होण्याची शक्यता आहे. केरळच्या बहुतांश भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरु झाला आहे. मान्सूनला यंदा तब्बल एक आठवडा विलंब झाला आहे. एरवी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मान्सून दाखल झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सून लाबल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. लवकरच राज्यात मान्सून दाखल होणार असल्याने उकाड्यातून नागरिकांची सुटका होईल. जवळपास एक आठवडा उशिराने मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.