गाव तिथे एस.टी. ही सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकरांनी दिलेली देणं आहे – विनोद मोरे

0

मुंबई दि. १३ (रामदास धो. गमरे) सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकरांनी एक आदर्श पुत्र म्हणून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मरथ त्यांच्या पश्चात वाऱ्याच्या वेगाने भारतभर यशस्वीपणे पुढे नेत धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याला अनुसरून “गाव तिथे एस. टी.” हा प्रस्ताव मंजूर करून घेतल्याने आजतागायत दुर्गम भागातील गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होत असल्याचे दिसत आहे हे आपल्याला नाकारता येत नाही, खेडी असो की शहर असो प्रत्येक शाळेत शाळेतील मुलांना सकस आहार योजना ही त्यांनी मंजूर करवून घेऊन ती अंमलात आणली म्हणून आज खेड्यापाड्यापासून ते शहरापर्यंत गरीबापासून श्रीमंतापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना सकस आहार मिळतो हे नाकारता येत नाही. भैय्यासाहेबांनी बौद्धाचार्यांची निर्मिती केली, चैत्यभूमीची निर्मिती केली. कफ परेड इथला बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याच काम केलं, बौद्धजन पंचायत समितीचे दादर सभागृह हे भारतातील बाबासाहेबांचं पहिल सभागृह उभे करण्याचं कामकाज त्यांनी आपल्या स्वकर्तुत्वाने पूर्ण केले. अशी भैय्यासाहेबांनी केलेली कामे आहेत जी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली नाहीत, बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा असून ही त्या नावाचा वापर न करता स्वतःच्या हिमतीने मी बाबासाहेबांचा कार्यकर्ता आहे या भावनेने त्यांनी परिश्रम घेऊन, स्वतःच्या सुखांचा त्याग करून जे कार्य केले ते महान आहे त्यामुळे बाबासाहेबांप्रमाणे भैय्यासाहेबांच जे कार्य आहे ते बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून पुढे आणण्याचे प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून भैय्यासाहेबांचे कार्य किती महान आहे हे सर्वसामान्य लोकांना कळेल” असे प्रतिपादन उपसभापती विनोद मोरे यांनी भैय्यासाहेबांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सभेत बोलत असताना केले.

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने सुर्यपूत्र यशवंत तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ११३ वा जयंती महोत्सव उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे १२ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभी भैय्यासाहेब व महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली. संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार आणि मनोहर बा. मोरे यांनी आपल्या गोडवाणीने धार्मिक विधीपठण केले तर सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सूत्रसंचालन केले त्याप्रसंगी सूत्रसंचालन करीत असतानाच आपल्या पहाडी, भारदस्त व प्रभावी आवाजात व लाघवी भाषाशैलीत त्यांनी अधूनमधून भैय्यासाहेबांच्या कार्याचा आढावा घेतला. सदर कार्यक्रमास कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष व बौद्धजन पंचायत समितीच्या पतपेढीचे अध्यक्ष किशोर मोरे, उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे (कणगोलकर), एच. आर. पवार, मनोहर सखाराम मोरे, चंद्रमनी तांबे, अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, यशवंत कदम, संदेश खैरे, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, महेंद्र पवार, अरुण मोरे, तुकाराम घाडगे, अतुल साळवी, शिक्षण समितीचे माजी चिटणीस शिर्के, निवडणूक मंडळाचे मिलिंद जाधव, महिला मंडळाच्या सुशीलाताई जाधव, अंजलीताई मोहिते, कॉन्ट्रॅक्टर कांबळे, विश्वस्त मंडळ, विविध समित्यांचे पदाधिकारी, महिला मंडळ, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता! लोकसभेत १५ बैठका, ९२ तास काम, १० विधेयके ८ मंजूरचे कामकाज

सदर कार्यक्रमाची सुरुवात काशीराम मोरे यांच्या भीमगीताने झाली तसेच सुशीलाताई जाधव, अरुण मोरे, मंगेश पवार, एच. आर. पवार, अशोक कांबळे (कणगोलकर), माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत आदी मान्यवरांनी आपले मौलिक विचार मांडले. शेवटी बौद्धजन पंचायत समितीच्या सदस्या सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या सासूबाई प्रेमा पांडुरंग साळवी व अशोक मुकुंद आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी आणि राजरत्न आंबेडकरांच्या आई अश्विनी अशोक आंबेडकर यांचं एकाच दिवशी निधन झालं त्यांचा दुःखद ठराव पारित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व तद्नंतर सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!