काळोखाचा फायदा घेऊन तिघांनी महिलेला उचलून नेले अन् मैदानात…ग्रामस्थ आक्रमक

0
2

कामावरून घरी येणाऱ्या महिलेला तिघा परप्रांतीयांनी एका मैदानात उचलून नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अलिबागच्या चिंचोटी येथे घडली आहे.

रायगड/अलिबाग: रायगड जिल्हयात अलिबाग जवळ चिंचोटी येथे गेल कंपनीत काम करणाऱ्या तीन परप्रांतीय कामगारांनी एका महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही महिला घरी जात असताना काळोखाचा फायदा घेऊन तिला उचलून देण्यात आले होते यावेळी या महिलेची आरडाओरडा ऐकून काही ग्रामस्थ त्या ठिकाणी दाखल झाले. त्यामुळे या तीन कामगारांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी यातील एक कामगार ग्रामस्थांच्या हाती लागला त्याला चांगला चोप देण्यात आला व पोलिसांच्या हवाली करण्यात आले.दरम्यान या सगळ्या प्रकरणात आता अलिबाग पोलिसांनी तीनही संशयित आरोपींना अटक केली आहे. मात्र या सगळ्या प्रकरणी आता ग्रामस्थांनी आक्रमक घेतली असून गेल कंपनीसमोर ठिय्या आंदोलन करत भैय्या हटाव असा नारा दिला आहे. गेल कंपनीत कामाला असल्याचे कळल्यानंतर आज गावकऱ्यांनी गेल कंपनीसमोर धरणे धरली. त्यांनी कामबंद करण्याची मागणी करत कंपनीत जाणारी वाहने रोखून धरली. यावेळी भैया हटाव, बेटी बचाओ चे असा नारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

अलिबाग तालुक्यातील चीचोटी गावात राहणारी पिडीत महिला रोज कामानिमित्त वावे येथे पायी येऊन जाऊन करीत होती. शुक्रवारी १७ मार्च रोजी नेहमीप्रमाणे पिडीतही आपले काम आटोपून घरी जाण्यास पायी निघाली होती. सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ती चींचोटी गावाच्या हद्दीत आल्यावर तिच्या पाळतीवर असणाऱ्या तीन नराधमांनी काळोखाचा फायदा घेत, तिला उचलून बाजूच्या खेळाच्या मैदानात नेवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.पिडीत महिला आरडाओरड करीत असल्याने तिचे तोंड दाबून ठेवले. सुदैवाने तिचा आवाज काही ग्रामस्थांनी ऐकल्याने तिकडे धाव घेतली. त्यामुळे आरोपी पळू लागले. ही घटना गावात कळल्यावर आणखी ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तीनपैकी एकजण ग्रामस्थांच्या हाती लागला. त्याला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. मात्र तो वावे येथे पळून आला.ग्रामस्थानी त्याला पुन्हा पकडले. या घटनेनंतर पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. फरार दोन आरोपींना ही अटक करण्यात आली आहे. अतिप्रसंग घटनेतील एकाला मारहाण झाली असल्याने त्याला रुग्णालयात नेणे गरजेचे होते. मात्र आरोपींना आमच्या ताब्यात देण्याबाबत ग्रामस्थ आग्रही होते. पोलीस ग्रामस्थांना दीड तास समजावण्याचा प्रयत्न करीत होते.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

पण ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. गुन्ह्यातील तीनही संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. दरम्यान, हे तिनही आरोपी उसर येथील गेल कंपनीत कामाला असल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी गेल कंपनीच्या गेटवर आंदोलन केले.