मुंढर दि. ११ (रामदास धो. गमरे) ग्रामपंचायत मुंढर कातकीरी कार्यक्षेत्रातील मुक्काम गाव मुंढर बौद्धवाडी एस. टी. स्टॉप ते जेतवन बुद्धीविहार या ९०० मीटर रस्त्याचे साफसफाई व रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढणे हे काम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत मुंढर येथील बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. २४ व रमाई महिला मंडळ यांचे पदाधिकारी, सभासद व बौद्ध ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून पूर्णत्वास आले.






सदर श्रमदानामुळे पादचारी व वाहनांना रस्त्याने ये जा करण्यास आता सोयीचे झाले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी समाधानाची भावना व्यक्त केली आहे. सदर श्रमदान करण्यासाठी बौद्धवाडीतील बौद्धजन सहकारी संघाचे शाखाध्यक्ष दर्शन तुकाराम गमरे, माजी चिटणीस अनिल सखाराम जाधव, जेष्ठ सभासद संजय भिवा पवार, सुनील भागूराम गमरे, रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सानिका सचिन गमरे, महासचिव मिरीजा निलेश गमरे, सहसचिव माधवी मंगेश जाधव, खजिनदार अश्विनी अनिल जाधव, दीपिका दर्शन गमरे, अरुणा बाबाजी गमरे, स्वप्नाली संदीप गमरे, शीतल संजय पवार, सुवर्णा मनोहर गमरे, संगीता नारायण मोहिते, दिक्षिता सागर सुर्वे, वासंती मनोहर पवार, शैला गोविंद मोहिते, प्रमिला विठ्ठल गमरे, सरिता सुनील गमरे आणि इतर मान्यवर ग्रामस्थ सहभागी झाले होते.
सदर ग्रामस्थांना श्रमदानाने महत्व पटवून देऊन श्रमदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मुंढर गावच्या विद्यमान सरपंचा अमिषा अजित गमरे व ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे, सचिन चाळके व महिला पदाधिकारी उपस्थित होते, सदर उपक्रमामुळे स्वच्छता अभियानास बळकटी मिळून गावातील विकासासाठी एकात्मता व सहकार्याची भावना दृढ झाली आहे म्हणून स्वच्छता अभियानास बळकटी मिळून रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यास श्रमदानाच्या माध्यमातून सहभाग घेणाऱ्या सर्व श्रमदानवीरांचे ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.













