मोरया मित्र मंडळाने या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव काळात तुमचे शैक्षणिक दान ठरेल विद्यार्थांसाठी योगदान हा उपक्रम राबविला होता. यामध्ये आवाहन करण्यात आले होते की श्री गणेश चरणी कोणत्याही प्रकारचा प्रसाद, हार, नारळ, पेढे अर्पण न करता वही, पेन, दप्तर, शालेय साहित्य अर्पण करावे ह्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद नागरिक, हितचिंतक, वर्गणीदार यांनी दिला. ह्यामध्ये भरपूर प्रमाणात वह्या, पुस्तके, दप्तर, कपडे जमा झाले. ते सर्व साहित्य मुळशी तालुक्यातील दुर्गम भाग भोईनी, मुगाव ,गडले ह्या भागात वाटप करण्यात आले. यावेळी मुलांना पहिली ते चौथी मुलांसाठी चित्रकला वही, इंग्रजी अंक,अक्षर सरावासाठी पुस्तके, दप्तर,पेन, पेन्सिल, कपडे, रंग पेटी इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले.






यावेळी मोरया मित्र मंडळ संस्थापक केदार वसंत मारणे म्हणाले मोबाईलचा वापर टाळावा, कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवु नये. शिका,वाचन करा विद्यार्थ्यांनी जिज्ञासा, धैर्य, एकाग्रता, संयमाने यश संपादन करावे. विविध प्रकारच्या परिक्षेत यश संपादन करायचे असेल तर आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर मेहनत करणे आवश्यक आहे स्वतःवर विश्वास ठेवून मनाची तयारी केली तर निश्चित यश प्राप्त होईल. घर व परिसर आपला स्वच्छ राहिला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी दक्ष राहावे. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे. स्वच्छतेचे आणि व्यसनमुक्तीचे दूत म्हणून विद्यार्थ्यांनी समाजाच्या हितासाठी काम करावे असेही मारणे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खारवडे श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संभाजी गावडे म्हणाले, मोरया मित्र मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. मंडळ कोणताही डिजे न लावता धांगडधिंगा न करता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर काम करते मंडळाचे सर्वच कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात पोहचले आहे. आज पर्यंत त्यांनी केलेल्या कार्यांत प्रतिष्ठित नागरिकांनी सहकार्य करत आहे त्यांनी आणखीन जोमाने कार्य करावे असे मत गावडे यांनी यांनी व्यक्त केले.
यावेळी इतिहास संशोधन मंडळ अजीवन सदस्य मंगेश नवघणे,खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त संभाजी गावडे, समीर राऊत ,भोईणी ग्रां.प विद्यमान सरपंच अलकाताई संतोष झोरे माजी सरपंच सुनील झोरे माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण झोरे विद्यमान उपसरपंच विशालभाऊ झोरे मुगाव/कोळोशी/गडले ग्रुप ग्रां.प विद्यमान उपसरपंच मुगाव मारुतीभाऊ कोकरे तंटामुक्ती अध्यक्ष पोपटराव भाऊ पासलकर, संतोष झोरे,शिक्षक सागर शिंदे उपस्थित होते.












