ठाकरे गटाला पुन्हा धक्का? विधानपरिषदेच्या नीलम गोऱ्हे शिवसेनेत; आज दुपारीच प्रवेश होणार

0
5

उद्धव ठाकरेंच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे, असा अंदाज सध्या व्यक्त होत आहे. ठाकरे गटातील एक मोठा नेता नीलम गोऱ्हे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहे. ठाकरे गटातील विधान परिषदेचा एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची माहिती मिळत आहे. तसेच, आजच या आमदारासह काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आज शिंगे गटात प्रवेश करणार आहेत.

ठाकरेंच्या विश्वासू नेता आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. हा नेता विधान परिषदेचा आमदारही आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमांमध्ये शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज दुपारीच हा प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एबीपी माझानं ही बातमी सर्वात आधी दिली. या आमदारासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करुन धक्का दिला होता. आज त्यापेक्षा मोठा धक्का ठाकरेंना बसणार आहे. विधान परिषदेतला बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

हा पक्षप्रवेश आज दुपारी होणार असल्याची माहिती आहे. मागील अनेक वर्षांपासून पक्षाची बाजू खंबीरपणे मांडणाऱ्या या नेत्यांसोबत आणखी दोन मोठे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळतंय. सध्या त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत असून आज दुपारी ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याचं दिसून येतंय. सुरु झालेली पक्षप्रवेशाची मोहीम थांबायचं नाव घेत नाही. प्रत्येक विभाग, जिल्हा, तालुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवरील पदाधिकारी शिंदेंवर विश्वास दाखवत आहेत.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

आजचा संभाव्य पक्षप्रवेश झालाच तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसेल. कारण मागील कित्येक वर्षांपासून ते पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत आहेत. एक निष्ठावान ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. ते कधी शिंदेंकडे येतील, असं वाटत नव्हतं. परंतु आज प्रवेश निश्चित असल्याचं मानलं जात आहे. एकनाथ शिंदेनी मनिषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी केली नियुक्ती केली आहे.

त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश करताच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचेच निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक अमेय घोले यांनीही नाराजी व्यक्त करत शिंदे गटाची वाट धरली होती.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे