राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

0
71

संपूर्ण राज्यात पावसाने गेल्या काही दिवसांत धुमाकूळ घातला होता. त्यासोबत मुंबईत ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस होऊन चार दिवस मुंबई ठप्प पडली होती. तर काही भागात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भ, मराठवाडा येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने मुंबईला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबईला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर, ठाणे, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसतील.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे नवे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या पुढील तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि गोव्याच्या किनारपट्टीवर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावासासाठी अनुकूल हवामान तयार झालं आहे. कोकण आणि घाटमाध्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकणला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आ.. यादरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

आठ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

पुण्यासह आठ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी (3 सप्टेंबर) राज्यातील पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती आहे. राज्यातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर, गोंदियामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

तर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोलीत मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.