केवळ भारतालाच नाही तर अखिल विश्वाला बुद्धाशिवाय पर्याय नाही – प्रा. विजय मोहिते

0

मुंबई दि. ९ (रामदास धो. गमरे) “भारताच्या प्रत्येक भागात बुद्धधम्माची गाठ असलेला इतिहास आहे. मुंबईस्थित ‘म्हातारीचा बूट’ म्हणजे प्राचीन काळातील व्यापारी व सांस्कृतिक वाटा आहे तर कोकणातील चिपळूण व परशुराम घाट परिसरातही बौद्ध संस्कृतीची चिन्हे आढळतात या घाटमार्गानेच प्राचीन भारतातील व्यापारी आणि भिक्षू दक्षिण व पश्चिम किनाऱ्यावर बुद्धविचार प्रसारित करीत. मालशेत घाटापासून ते नाशिक, कार्ले, भजा, कान्हेरी, औरंगाबाद, अजिंठा, वेरुळ, नालंदा, राजगीर अशा असंख्य ठिकाणी असलेली बुद्ध लेणी ही भारताच्या सांस्कृतिक चेतनेची जिवंत उदाहरणे आहेत. या लेण्यांमध्ये केवळ कलात्मकता नाही तर त्यातून त्या काळातील सामाजिक समता, शिक्षण आणि करुणेचा प्रवाह दिसतो. आजचे जग वेगाने तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, युद्धतंत्रज्ञान, हवामानबदल हे सारे मानवतेसमोर नवे प्रश्न उभे करत आहेत परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरे तंत्रज्ञानात नाहीत ती मानवी चेतनेच्या प्रज्ञेत आहेत म्हणूनच केवळ भारतालाच नाही तर अखिल विश्वाला बुद्धाशिवाय पर्याय नाही” असे प्रतिपादन पाली भाषेचे गाढे अभ्यासक प्रा. विजय मोहिते यांनी सम्राट अशोक विजयादशमी, ६९ वा धम्मचक्रप्रवर्तन दिन व बौद्धजन पंचायत समितीच्या शाखा क्र. ८३० चे १३ वे वर्षेपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता या नात्याने बोलत असताना केले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. ८३० संलग्न माता रमाई महिला मंडळ चिंचपाडा कल्याण पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक विजयादशमी, ६९ वा धम्मचक्रप्रवर्तन दिन तसेच शाखेचे वर्ष १३ वे वर्षपूर्ती कार्यक्रम प्रशांत तुळशीराम गमरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अनिल शिवराम गमरे यांनी आपल्या पहाडी आवाजात अत्यंत प्रभावी भाषाशैलीत केले तर सिध्दार्थ गोविंद पवार यांनी प्रस्ताविक सादर करताना पंचायत समितीचा अनुभव आणि कार्यकर्त्यांची तळमळ यावर प्रकाश टाकला, तद्नंतर सर्वांच्या विनंतीस मान देऊन पुज्य भन्ते मुदितानणंद यांनी सुमुधुर व पवित्र वाणीने धार्मिक पूजाविधी संपन्न केला. कार्यक्रमांचे अध्यक्ष प्रशांत तुलशिराम गमरे यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. त्यानंतर २०२५ साली भरघोस गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना मौलिक मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोबतच मान्यवर, जेष्ठ महिला-पुरुष कार्यकारिणी यांना पंचाध्वज, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत गमरे यांनी “प्राध्यापक विजय कृष्णा मोहीते यांनी ‘डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थ्यांना संदेश’ या विषयावर मुद्देसूद मांडणी करत केलेले विवेचन हे प्रत्येक धम्मबाधंवाच्या डोळ्यात अंजन घालणारे असून ‘मी बौध्द धम्माच्या विरूद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही’ हे ऊपस्थितीत सर्वांच अगदी साध्या व सोप्या भाषेत सौंदहरणास पटवून दिले त्यामुळे त्याचे आभार मानले व त्यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले.

सदर कार्यक्रमास कार्याध्यक्ष अनिल बा.जाधव, उपाध्यक्ष प्रदिप ज. काब॓ळे, मिलिंद ग.पवार, खजिनदार सुनिल तुकाराम पवार, उपखजिनदार सचिन वि. पवार, उपसचिव रुपेश ज. जाधव, निलेश सु. मोहीते, सल्लागार विष्णु वि. पवार (बौध्दाचार्य), वाल्मिक र. पगारे, संदिप म.हिरे, सुशील के. मोरे, प्रदिप पा.जाधव, ₹ सिध्दार्थ गो. पवार, अंनत पा गमरे, मुकेश के.जाधव, महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा ज्योती अनिल गमरे, उपाध्यक्षा सुप्रिया सु.पवार, अस्मिता अ.जाधव, खजिनदार स्वाती प्रमोद जाधव, उपखजिनदार अस्मिता प्र. कांबळे, सुनिधी प्र.गमरे, सचिव सानिका स. पवार, उपसचिव पुजा प्र.जाधव, उपसचिव पार्वती वा पगारे, माजी सचिव सुषमा सु.सिंग, सल्लागार प्रेमा सु.सुर्यगंध आशा मु. गमरे, स्मिता सु.मोरे, अनिता अंनत गमरे, ज्योती वि.जाधव, ललिता पा. जाधव, मालती के. जाधव, स्मिता सि. पवार, सुजता तु.गमरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार व्यक्त करून प्रकाश तुळशीराम गमरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन