कोथरूड एका साध्या चोरीत सूत सापडताच दहशतवादी जाळे असे उघड? सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई

0

कोथरूडच्या मध्यवस्तीमध्ये एका किरकोळ दुचाकी चोरीच्या तपासाने धक्कादायक वळण घेत सध्या पुणे शहराला हादरवून सोडले आहे. महाराष्ट्र एटीएस (ATS) आणि पुणे पोलिसांना या चोरीच्या तपासात दहशतवादी संघटनांशी संबंधित एका मोठ्या नेटवर्कचा सुगावा लागला. या माहितीच्या आधारावर, गुरुवारी पहाटेपासून कोंढवा, वानवडी, खडकी आणि इतर परिसरात सर्वात मोठी छापेमारी सुरू झाली असून, शहरभर खळबळ उडाली आहे.

ATS च्या कारवाईत काय झालं?

एटीएस आणि पुणे पोलिसांच्या सुमारे 200 अधिकारी आणि 500 कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने कोंढवा आणि आसपासच्या परिसरात तब्बल 25 ठिकाणी एकाच वेळी झडती घेतली. ही कारवाई राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मोठ्या तपासाचा भाग असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

अधिक वाचा  पुण्यात भाजपा मित्र पक्षाला मोठा धक्का; भाजपलाही धक्कादायक प्रवेशामुळे ही नवी भिती! एकावेळी २०० कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा

या कारवाईदरम्यान पथकाने लॅपटॉप्स, सिम कार्ड्स, मोबाईल फोन्स आणि काही संवेदनशील कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणात 18 संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. यापैकी काहींना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

चोरीतून उघड झाली ‘ISIS’ मॉड्युलची साखळी

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 2023 मध्ये पुराव्यांवरून या चोरीत सहभागी असलेल्या काही जणांचे कट्टरपंथी संघटनांशी थेट संबंध असल्याचे उघड झाले.

या प्रकरणाच्या तपासात हडपसरमधील नोबेल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका डॉक्टरचे नाव समोर आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या डॉक्टरने “आयएसआयएस (ISIS) मॉड्युल नेटवर्क” तयार केले होते. हे नेटवर्क दहशतवादी संघटनांसाठी निधी उभारणी आणि आर्थिक व्यवहाराचे काम करत होते. 17 आरोपींपैकी काहींचा थेट दुबईशी संपर्क असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

केंद्रीय गुप्तचर यंत्रणा गेल्या 2 वर्षांपासून या नेटवर्कवर लक्ष ठेवून होत्या, ज्याची मुळे आता कोंढवा परिसरात रुजली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोंढवा ‘हॉट स्पॉट’ रडारवर

एटीएसच्या अहवालानुसार, कोंढवा परिसर बाहेरून आलेल्या लोकांना सहजपणे भाड्याने घरे उपलब्ध होत असल्याने दहशतवादी हालचालींसाठी एक ‘सेफ हाऊस’ म्हणून वापरला जात आहे. पोलिसांना या भागात गेल्या काही वर्षांपासून स्लीपर सेल्स सक्रिय असण्याची शंका आहे.

2022-2023 मध्ये कोंढव्यातून दोन दहशतवादी अटक झाल्यानंतर हा परिसर गुप्तचर संस्थांच्या रडारवर आहे. त्याच परिसरातील अशोका (गुरुपुरम) सोसायटी पुन्हा एकदा तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे, जिथे यापूर्वीही संशयितांना अटक करण्यात आली होती.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

पोलिसांचे आवाहन

पुणे पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक मुस्लिम समाजानेही, “कोंढवा काही बाहेरून आलेल्या लोकांमुळे बदनाम होत आहे. घर भाड्याने देताना कागदपत्रांची काटेकोर तपासणी करणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले आहे.

कोंढवा आणि आसपासच्या भागात नाकाबंदी आणि सुरक्षा वाढवण्यात आली असून, ही मोहीम आज उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. एटीएसकडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे.