विधानसभेत दादांच्या या 3 गुणाचेच ‘मार्केटिंग’ करणार; राष्ट्रवादीचा प्लॅन तयार; प्रतिमा उंचावण्याचं काम होणार

0

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले होते. आता विधानसभा काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने अजित पवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभेसारखी विधानसभेमध्ये पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अजित पवारांनी एका नव्या रणनीतीकाराची नेमणूक केली आहे. विधानसभेला चांगले यश मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. ‘साम टीव्ही’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अजित पवार गटाने नरेश अरोरा यांची निवडणूक रणनीतीकार म्हणून नेमणूक केली आहे. अरोरा हे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या बैठकीला उपस्थित होते. विधानसभेसाठी अजित पवार गटाने मोठी खेळी खेळल्याचं बोललं जातंय. याआधी नरेश अरोरा यांनी अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या प्रचाराचे काम पाहिले आहे. निवडणूक रणनीतीमध्ये त्यांचा हातखंडा आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

कोण आहेत नरेश अरोरा?

नरेश अरोरा हे पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनीचे संस्थापक आहेत. याआधी त्यांनी काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन केले आहे. राजस्थान, कर्नाटकसह इतर काही राज्यांत त्यांनी काँग्रेसच्या प्रचार व्यवस्थापनाचं काम पाहिलं आहे. त्यांच्या या क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव पाहता अजित पवार गटाने निवडणूक रणनीतीकार म्हणून त्यांना निवडलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नरेश अरोरा यांनी विधानसभेसाठी त्यांची ब्रँडिग आणि रणनीती अजित पवार गटासमोर मांडली आहे. पक्षाला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ९० दिवसांचा प्लॅन तयार केला आहे. अजित पवारांनी बजेटमध्ये केलेल्या मोठ्या घोषणांवर जास्त लक्ष दिले जाणार आहे. बजेटमधील घोषणांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

अजित पवार यांची प्रतिमा उंचावण्याचं काम केलं जाणार आहे. त्यांचे प्रशासकीय कौशल्य, विश्वसनीयता, आश्वासन पूर्ण करण्याची धमक या गोष्टींवर जास्त लक्ष दिले जाईल. विरोधकांच्या खोट्या दृष्टीकोनाला बळी न पडता विकासकामांचा प्रचार करण्यास नेत्यांना सांगण्यात आलं आहे.