राज्यात दिवाळीनंतर केव्हाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. या निवडणुकीत देखील विधानसभेसारखी कामगिरी करत मोठा विजय मिळविण्यासाठी महायुती प्रयत्नशील असणार आहे. पण असे असले तरी जागावाटपात रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येणार आहे. तत्पूर्वी या निवडणुकांना समोरे जाण्यासाठी महायुतीकडून एक प्लॅन तयार करण्यात आला आहे.






स्थानिक निवडणुका या अत्यंत महत्वाच्या असून या निवडणुकांना मिनी विधानसभा असे संबोधले जाते. महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी म्हणजेच भाजप देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी स्थानिक निवडणुकांच्या आखड्यात उतरण्याची तयारी दर्शवत तशा पद्धतीने आखणी केली आहे. दुसरीकडे या निवडणुकीत मविआ आणि मनसे यांच्याकडून कोणती स्ट्रटर्जी फॉलो केली जाते, हेही पाहणे तितकेच महत्वाचे असणार आहे. या निवडणुकीच्या संभाव्य तारखा समोर आल्या असून दिवाळीनंतर नोव्हेंबर ते जानेवारी असा कार्यकाल निवडणुकांचा असणार असल्याची माहिती आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मोठी आखणी केली असून जिल्हा पातळीवर एक समिती निर्माण केली जाणार आहे. या समितीत पालकमंत्री व पक्षांचे नेते असणार आहेत. यासोबतच जिल्ह्यातील आमदार व इतरही असणार आहेत. ही समिती जिल्ह्यातील महायुतीची परिस्थीती कशी आहे, महायुतीच्या पक्षांची ताकद, जिल्ह्यात महायुती अंतर्गत वाद, या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन हा आढावा राज्य समिती समोर ही समिती सादर करेल. यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ज्या ठिकाणी वाद असतील तेथील निर्णय महायुतीचे प्रमुख घेतील, असेही सांगण्यात आले आहे.
निवडणुकीची उत्सुकता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल दिवाळीनंतर वाजणार असून, तशा पद्धतीने हालचाली सुरू झालेल्या आहेत. महायुतीचा निवडणुकीचा प्लॅन समोर आला असून आता मविआ कशा पद्धतीने निवडणुकीची आखणी करणार हे पाहावे लागणार आहे.











