महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणजे वारजे माळवाडी! पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून गेली 20 वर्ष (भारतीय जनता पक्षाची लाट आलेली असताना सुद्धा) कायम नगरसेवकांच्या अंगावर विजय गुलाल देणाऱ्या भागातील स्थानिक समस्या सोडवण्यासाठी दस्तूरखुद्द अजितदादा पवार यांनीच लक्ष घातले असून आता ‘दादांचा वादा’च वारजे माळवाडीला मोकळा श्वास घेण्यास मदत करणार आहे. आजपर्यंत नुसत्या हिरवळीच्या लॉन्सच्या जीवावर वारजे बलतेय अन् काम म्हणजे….. अशा वल्गनापेक्षा प्रत्यक्षात स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्या सकाळी अन दुपारी राष्ट्रवादी परिवार मिलन!च्या निमित्ताने वारजे माळवाडी भागात दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. वारजे माळवाडीतील अजितदादा पवार यांचे अत्यंत विश्वासू माजी उपमहापौर दिलीपभाऊ बराटे व माजी विरोधी पक्ष नेत्या दिपालीताई बाबा धुमाळ यांच्या सर्वांगीण आणि सर्व समावेशक विकासाच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या दुपारी थेट नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी यशोदीप चौक व व्हायला चौक येथे ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ या उपक्रमांतर्गत जनसंवाद करणार आहेत.






वारजे विकास कृती समितीच्या वतीने माजी उपमहापौर दिलीपभाऊ बराटे व माजी विरोधी पक्षनेत्या दिपालीताई बाबा धुमाळ वारजे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसमवेत पुणे महापालिका व माळवाडी पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. विश्वजीत कायंगडे, वारजे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासोबत चर्चा करून वारजे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सविस्तर बैठका घेण्यात आल्या असल्या तरी विकासाराखड्यातील रस्त्यांबाबत शासकीय विभागाच्या जमिनीची मुख्य अडचण लक्षात घेता उद्याच्या दौऱ्यामध्ये यामध्ये ‘रामबाण’ उपाय निघण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने जागाबाधीत गावकऱ्यांना योग्य मोबदला दिला जात नसल्याने जागेचे अधिग्रहण रखडलेले आहे. पुणे शहराची वाढ होत असताना या भागात असंख्य रहिवाशांनी छोट्या छोट्या प्लॉटच्या माध्यमातून जागा खरेदी केली असून त्यानंतर बनवण्यात आलेल्या विकासाला आराखड्यातील रस्त्यासाठी संबंधित जागा मालक बाधित होत असून यांना योग्य मोबदला पुणे महापालिकेमार्फत दिला जात नसल्यामुळे ‘सेवा’ रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. याबाबत अजित पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे महापालिकेत प्रशासकराज सुरू झाल्यापासून वारजे माळवाडी भागातील पाणी समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. मुळात वारजे माळवाडी विकसित होत असताना गृहीत धरलेल्या लोकसंख्येला आवश्यक पाण्याची क्षमता स्थानिक नगरसेवकांनी केलेली असतानाही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुणे महापालिकेच्या वतीने 24×7 पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी बनवून वापरात आणली असतानाही निर्माण होणारी पाणीटंचाई कशी सोडवली जाईल याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.
वारजे माळवाडी भागाचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका गेली 20 वर्ष मा. अजितदादा पवार यांच्या विचारानेच स्थानिक नगरसेवक करत असून यामध्ये बऱ्याच प्रमाणात सकारात्मक बदल करणे शक्य झाले असले तरीसुद्धा केंद्रशासन स्तरावरील प्रश्न व वरिष्ठ प्रशासकीय निर्णय यासाठी दस्तूर खुद्द अजितदादा पवारच लक्ष घालत असल्यामुळे संपूर्ण वारजे सरांना मोकळा श्वास घेणे शक्य होणार असल्याची खात्री स्थानिक नगरसेवक दिलीप बराटे, बाबा धुमाळ यांना वाटत आहे. स्थानिक नगरसेवक या नात्याने वारजे माळवाडी परिसरात नव्याने निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी गेली २ ते ३ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पाठपुरावा करत आहेत. उपमहापौर दिलीपभाऊ बराटे, श्रीकृष्ण बराटे, वासुदेव भोसले, सतिशभाऊ बोडके, बाबा धुमाळ , किरण बारटक्के, कैलाश दांगट, सचिन दशरथ दांगट, दत्तात्रय चौधरी, सचिन बराटे, निलेश घारे, यशवंत ठोकळ, दत्ता झंजे, सचिन विष्णू दांगट , दत्ता पाखिरे, विनायक लांबे, कैलास देवकर , पराग ढेणे, नाना सोनवणे, सतीश पाटील, निलेश आगळे, रफिक शेख, निवृत्ती येनपुरे ,राम बराटे, भावना पाटील, वसंत कोळी यांचेसह अनेक सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रित प्रयत्न सुरू केलेले असताना आत्ता दस्तूरखुद्द अजितदादा पवार यांनीच लक्ष घातल्याने या पाठपुराव्याला नक्की यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही वारजे माळवाडी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.











