देशातील क्रेडिट ‘क्रेडिट कार्ड किंग’ प्लास्टिक मनीचा उपयोग कळला ‘इतके’ क्रेडिट कार्ड; १रुपयाही कर्ज नाही

0

भारतात क्रेडिट कार्ड म्हणजे जितकी संधी तितकाच धोका मानल्या जातो. बिल अथवा खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर करण्यात येतो. पण त्याचे बिल वेळेत भरले नाहीतर मग कर्जाचा डोंगर वाढायला वेळ लागत नाही. पण दिल्लीतील मनीष धमेजा यांनी या विचारालाच पहिला हादरा दिला आहे. त्यांच्याकडे एक, दोन, 100, 500 नव्हे तर 1638 इतके क्रेडिट कार्ड आहे. त्यांना भारताचे क्रेडिट कार्ड किंग असं म्हटल्या जाते. विशेष म्हणजे त्यांच्याकडे इतके क्रेडिट कार्ड असले तरी त्यांच्यावर एक रुपया पण कर्ज नाही. मनीष यांनी क्रेडिट कार्ड केवळ खर्च करण्याचे साधन म्हणून वापरले नाही. तर ते कमाईसाठी त्याचा वापर करत आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

भारताचे क्रेडिट कार्ड किंग

मनिष धमेजा यांना भारताचा क्रेडिट कार्ड किंग उगाच म्हणत नाहीत. त्यांनी क्रेडिट कार्ड केवळ खर्च करण्यासाठी घेतले नाही. तर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ते कॅशबॅक, रिवॉर्ड पाईंट्स, ट्रॅव्हल बेनिफिट्सच्या माध्यमातून मोठी बचत आणि चांगली कमाई करतात. वृत्तानुसार त्यांचे या अफलातून कामगिरीमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले गेले आहे.

धमेजा हे मुळचे लखनऊचे रहिवाशी आहेत. पण ते दिल्लीत स्थायिक झाले. ते शिक्षणातही अग्रेसर आहेत. त्यांनी कानपूर सीएसजेएम विद्यापीठातून बीएससी, इंटीग्रल विद्यापीठातून एमसीए, इग्नूमधून मास्टर ऑफ सोशल वर्क अशा पदव्या मिळवल्या आहेत. याशिवाय बीआयटएस पिलानी येथून डेटा सायंसमध्ये एमटेक आणि एमिटी विद्यापाठीतून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागात काम करतात. ते एक डेटा सायंटिस्ट, सोशल वर्कर आणि युट्यूबर सुद्धा आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

1638 कार्ड्स पण एक रुपया कर्ज नाही

मनिष यांच्याकडे क्रेडिट कार्ड्सची जणू फॅक्टरी आहे. त्यांच्याकडे इतके क्रेडिट कार्ड्स असले तरी त्यांच्यावर एक रुपया सुद्धा कर्ज नाही. ते प्रत्येक क्रेडिट कार्डचा योग्य वापर करतात. आपल्या खर्च करण्याच्या मर्यादेपेक्षा क्रेडिट कार्डचा वापर कधीच जास्त करू नका असा त्यांचा सोपा मंत्र आहे. क्रेडिट कार्ड बिल भरण्यात ते अत्यंत शिस्तप्रिय आहेत. ते एकदिवस सुद्धा क्रेडिट कार्डचे बिल उशीरा भरत नाहीत. त्यांचा क्रेडिट कार्ड स्कोअर सर्वात चांगला मानल्या जातो.

1638 क्रेडिट कार्ड सांभाळण्यासाठी त्यांनी एक खास डिजिटल सिस्टिम तयार केली आहे. त्याआधारे ते प्रत्येक कार्डची बिलिंग सायकल, ड्यू डेट आणि ऑफर्सची माहिती ठेवतात. कोणते कार्ड ऑनलाईन शॉपिंगवर जास्त कॅशबॅक देते, कोणते कार्ड ट्रॅव्हल, लाऊंज एक्सेससाठी फायदेशीर आहे. कोणत्या कार्डवर हॉटेलिंग स्वस्त पडते याची त्यांच्याकडे खडा न् खडा माहिती आहे. त्यामुळे या प्लास्टिक मनीचा त्यांना खरा उपयोग कळला असे मानण्यात येते.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन