बौ. पं. समितीच्या वतीने श्रामणेर शिबिर व ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई दि. ३ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रामणेर शिबिर सांगता समारंभ व ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा पूज्य भदन्त डॉ. करुणाज्योति महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, प्लॉट नं. ६२-ए, सेक्टर नं. २९, वाशी, नवी मुंबई येथे २ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बा. मोरे यांनी केले तर मंगेश पवार यांनी कार्यक्रमाचे महत्व, व्यवस्थापन व सविस्तर माहिती देत प्रस्ताविक सादर केले. मान्यवरांच्या स्वागतानंतर श्रामणेर शिबिरामध्ये ज्यांनी भाग घेऊन दीक्षा घेतली त्या सर्व भन्तेजीना मा. सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. पाली अभ्यासक पूज्य भदन्त डॉ. करुणाज्योती महाथेरो यांनी पाली भाषा आणि त्रिपितक यावर मौलिक असे भाषण देऊन धम्मदेसना दिली.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अध्यक्षीय भाषणात आनंदराज आंबेडकर यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे विजयादशमीलाच धम्मदिक्षा का दिली यामागील खरी पार्श्वभूमी सविस्तर मांडून आता बौद्ध या नात्याने धम्मप्रचार व प्रसार करण्यासाठी व धम्माचा रथ पुढे नेण्यासाठी आपल्यावर कोणती जबाबदारी आहे यावर आपले मौलिक विचार मांडून उपस्थित उपासक उपासिकांना मार्गदर्शन केले. तद्नंतर उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत व माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे यांनी ही आपले मौलिक विचार मांडून उपस्थित उपासक, उपासिकांना मार्गदर्शन केले व श्रामणेर शिबिरार्थींना व उपस्थित सर्वांस मंगलकामना व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे, माजी सहसचिव सामाजिक न्याय विभाग दिनेश डिंगळे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, अशोक कांबळे (कणगोलकर), अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, लवेश तांबे, अनिरुद्ध जाधव, दीपक मोरे, सी. एम. कासारे, महिला मंडळ अध्यक्षा सुनीताताई जाधव, चिटणीस अंजलीताई मोहिते, सुशीलाताई जाधव, प्रमिलाताई मर्चंडे, अंजलीताई मोहिते, वाशी-नवी मुंबईमधील सर्व विभाग अधिकारी, सर्व गटप्रमुख, सर्व शाखा व त्यांचे पदाधिकारी, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे, श्रामणेर शिबिरार्थींचे व उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून मनोहर बा. मोरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा