मुंबई दि. २ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मा. सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास प्रवचन मालिका कार्यक्रम व श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर श्रामणेर शिबिराचे संघनायक पूज्य भदन्त डॉ. करुणाज्योती महाथेरो आणि त्यांच्या पूज्य संघाच शिवडी विभागात आगमन होताच भोईवाडा नाका येथे त्यांचं भव्यदिव्य स्वागत करण्यात आले त्यावेळी त्यांच्यासोबत संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार गुरुजी, चिटणीस मनोहर बा. मोरे गुरुजी, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, शिवडी विभाग क्र. १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, विभागीय कोषाध्यक्ष प्रविण तांबे गुरुजी, समाजसेवक भाई जाधव, सुवर्णा जाधव, राजेंद्र जाधव, मिलिंद जाधव, गौरी जाधव आणि जाधव परिवार, अशोक बगाडे, भारती बगाडे आणि बगाडे परिवार, प्रभाकर कसबे, विजय भिकाजी कांबळे, अशोक राजू कासारे,मंगेश बाळाराम पवार, महेश्वर साळवी, संतोष दिनकर कदम (रत्नागिरी), प्रतिभा भीमसेन मोहिते व विभागातील मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






पूज्य भदन्त डॉ. करुणाज्योती महाथेरो यांचं स्वागत झाल्यानंतर भगवान तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला विभागाचे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विभागीय कोषाध्यक्ष प्रविण तांबे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला समाजसेवक भाई जाधव यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचबरोबर भारती बगाडे व सुवर्णा जाधव यांनी ज्योत प्रज्वलित करून उपस्थितांनी पुष्पसुमने अर्पण केली तद्नंतर पूज्य भदन्त डॉ. करुणाज्योती महाथेरो यांनी सर्व उपासक उपासिकांना त्रिशरण पंचशील दिले पंचशील ग्रहण केल्यानंतर शोभा प्रभाकर कसबे यांच्या वतीने धम्मदान म्हणून पूज्य भदन्त डॉ. करुणाज्योती महाथेरो चिवर दान करण्यात आले तसेच भिख्खू संघातील सहाय्यक भदन्त शांतिबोधी, श्रामणेर भन्ते असित, भन्ते गुणरत्न,भन्ते जिवक, भन्ते रत्नप्रिय, भन्ते तिष्यसेन, भन्ते नंदप्रिय, भन्ते सुमंगल, भन्ते रत्नबोधी, भन्ते तिष्यमित्र, भन्ते अश्वदीप, भन्ते दिपंकर, भन्ते विजयानंद, भन्ते यशोधन, भन्ते संघपाल, भन्ते मेत्तानंद, भन्ते अनिरुद्ध, भन्ते सुमेधरत्न, भन्ते आदित्य, भन्ते यशपाल, भन्ते सुमन यांना भाई जाधव आणि अशोक बगाडे परिवाराच्या वतीने भोजनदान देण्यात आले. संघनायक पूज्य भदन्त डॉ. करुणाज्योती महाथेरो यांनी धम्मदेसना देत मंगलकामना देऊन कार्यक्रमाची सांगता केली.











