भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था ; पाच ट्रिलियन इकॉनॉमीकडे दमदार वाटचाल, जपानलाही मागे टाकले

0

मुंबई : पाच ट्रिलियन इकॉनॉमीच्या टारगेटच्या दिशेनं भारतानं आणखी एक पाऊल टाकलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता 4 ट्रिलियन डॉलर्सची झाली आहे. बलाढ्य जपानला भारताने मागे टाकत, जागतिक अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी गवर्निंग काऊंसिलिगच्या दहाव्या बैठकीनंतर ही माहिती दिली. आता भारतापुढे फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी आहेत. येत्या अडीच-तीन वर्षात भारत तिसऱ्या स्थानी पोहोचेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था

भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सची झाल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आयएमएफच्या हवाल्याने सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे. आता रताच्या पुढे आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीन देश आहेत. आपल्या कल्याणकारी योजनांवर, दूरगामी नियोजनावर, विकासाच्या गतीवर कायम राहिलो तर येत्या अडीच ते तीन वर्षांमध्ये आपण जर्मनीला मागे टाकून जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो असा विश्वास सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

विरोधकांची सरकारवर टीका

आदित्य ठाकरे यांनी रोजगाराच्या मुद्द्यावरुन कटाक्ष साधला. दुसरीकडे भारत जरी चार ट्रिलियन अर्थव्यवस्था बनला असला तरी रोजगाराच्या संधी मात्र त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत, इतरही अनेक समस्यांना सर्वसमान्यांना तोंड द्यावं लागत आहे अशी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

जगातील अनेक देश मंदीच्या सावटाखाली आहेत. कुठे युद्ध सुरु आहे तर कुठे अंतर्गत यादवी, या सगळ्याचा परिणाम जागतिक अर्थकारणावर होत आहे असं मत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केलं.

सुब्रमण्यम नेमकं काय म्हणाले?

भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलfयन डॉलर्सची झाली आहे

बलाढ्य जपानला मागे टाकत भारताची चौथ्या स्थानी झेप.

जगभरात सर्वत्र अस्थिर वातावरण असताना भारताची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. भारताने अशीच प्रगती सुरू ठेवली तर येत्या दोन-तीन वर्षात भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.

आधीच अस्थिरता असलेल्या जगात डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेने आयात शुल्क वाढवले आणि चीनपासून सगळ्याच देशांना वेठीला धरलं. या ट्रेड वॉरमुळे अनेक देशांचं गणित कोलमडल्याचं दिसतंय. अशा कठीण काळात भारतीय अर्थव्यवस्था तग धरून उभी आहे आणि हळूहळू पुढे सरकत जगात चौथ्या स्थानी पोहोचली आहे ही विशेष गोष्ट आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा