मनसेच्या  रावण दहन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद;  ‘कथा शौर्याची, श्रीरामाची’ लघुनाटिका ठरली लक्षवेधी

0

पुणे : सुरेल भजन व गीतांचा आनंद घेत, आर्ट ऑफ लिव्हिंगचे महत्व  आणि पुण्यात प्रथमच प्रभु श्रीरामावरील  ‘कथा शौर्याची, माझ्या श्रीरामाची’ या लघु नाटिकेसह अत्याधुनिक फायर शोचा मनमुराद आनंद घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  रावण दहन सोहळ्याला  नागरिकांनी  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजक व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे  (मनविसे) प्रमुख राज्य संघटक  प्रशांत कनोजिया यांनी यंदाही विजयादशमी निमित्त     कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनी येथील  स्वातंत्र्य वीर सावरकर मैदानात  भव्य रावण दहन सोहळ्याचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ  आर्ट ऑफ लिव्हिंग सत्संगाने झाला.त्यानंतर प्रसिद्ध गायक राजेश दातार यांनी प्रभु श्री राम यांचे गीत व भजन सादर केले. या सोहळयात  भारताचे पहिले पॅरालिम्पिक जलतरण स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलिकांत राजाराम पेटकर, राष्ट्रीय मोटोक्रॉस खेळाडू रूग्वेद बारगुजे, राष्ट्रीय एथलेटिक खेळाडू मानसी भरेकर यांचा विशेष सत्कार  करण्यात आला.  रावण दहनाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्व प्रभावीपणे मांडणाऱ्या व पुण्यात प्रथमच होणाऱ्या    ‘कथा शौर्याची, माझ्या श्रीरामाची’ या लघु नाटिकेने तसेच लहान मुलांचे विशेष आकर्षण असलेल्या  हरयाणा हिसार येथील कलाकार  हनुमानाच्या वेशभुषेत अवतरल्याने  नागरिक मंत्रमुग्ध झाले. क्रिडा भारती महामंत्री राज चौधरी, मनसेचे  नेते राजेंद्र वागसकर, माजी नगरसेवक किशोर शिंदे ,श्रीमती पुष्पा कनोजिया , संगिता तिकोणे व क्रिडाभारती पश्चिम महाराष्ट्र प्रमुख  विजय पुरंदरे , पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू  डॉ पराग  काळकर ,सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचे उल्हास रानडे ,आशिष साबळे, सचिन पवार, नरेंद्र तांबोळी, धनंजय दळवी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

 प्रभु श्री राम वेषातील कलाकार यांच्या हस्ते रावण पुतळ्याचे  दहन करण्यात आले. आयोजक प्रशांत कनोजिया यांनी आभार मानले आणि नागरिकांच्या आग्रहास्तव  पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूपात कार्यक्रम आयोजित करणार असल्याचेही  जाहीर केले.  सोहळा यशस्वी करण्यासाठी निलेश सैदाने,केतन डोंगरे,प्रसाद गोखले,पवन कनोजिया ,हेमंत पासलकर ,विनायक मुरूडकर,ऋषिकेश  परदेशी,निवास शिंदे,राहुल वाघवले  व सर्व मनसे मनविसे पदाधिकारी,रावण दहन सोहळा समिती,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे यांनी विशेष परिश्रम घेतले.पोलिस प्रशासन, फायर ब्रिगेड,मनपा प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांचेही  सहकार्य लाभले.