पुणे महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली प्रत्येक जण मतदारांना आकर्षित करण्यासाठी साड्या वाटप आणि लकी ड्रॉ आयोजित करत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा युवा शिलेदार मात्र एका अनोख्या उपक्रमाद्वारे नागरिकांच्या सामोरे जात आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याच उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस खडकवासला विधानसभेचे मा. अध्यक्ष कुणालआबा विलास वेडेपाटील यांच्या वतीने आरोग्य धन मोफत शस्त्रक्रिया शिबीर तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यक उपकरणे वाटप उपक्रम रविवारी, ०५ ऑक्टोबर २०२५ सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत ठिकाण: स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, भुसारी कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.






या शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या व विविध शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. याशिवाय महिलांसाठी विशेष तपासणी आणि आरोग्य शिक्षणाचे सत्रही घेण्यात येणार आहे. या शिबिरात 27 नामांकित दवाखाने सहभागी झाले असून अनुभवी डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व सल्ला मोफत दिला जाईल. कृपया प्रभाग क्रमांक १० मधील जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कुणालआबा विलास वेडेपाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.










