मोरया मित्र मंडळ कर्वेनगर यांच्या वतीने गणरायाच्या प्रथम आरतीचा मान , कर्वेनगर मधील आरोग्य खात्याचे साफसफाई कर्मचारी,झाडुन काढणाऱ्या महिला यांना देऊन त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.
केदार मारणे म्हणाले दररोज गणेश मंदिर परिसर नित्यनेमाने स्वच्छ ठेवुन, कर्वेनगर परिसर स्वच्छ ठेवुन नागरिकांचे आरोग्याचे रक्षण करतात,परिसर निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. प्रत्येक सणाला विशेष स्वच्छता केली जाते.प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी व निरोगी ठेवण्यासाठी सदैव तत्पर असणारे आरोग्य सेवक यांना फक्त कामच सांगायची का? आज आपला परिसर स्वच्छ आणि चकाचक आहे, ज्यांच्या मुळे गणेश उत्सव सुंदर आहे स्वच्छ आहे त्यांना कसे विसरुन चालेल.
वर्षभर आरोग्य सुरक्षित ठेवणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून त्यांना मोरया मित्र मंडळातर्फे दरवर्षी श्रींच्या स्थापनेच्या आरतीचा मान आरोग्य सेवेकांना देण्यात येतो. यावेळी आरोग्य सेवक आरोग्य कोठी नंबर 31 मुकादम अंकुश साठे, आणि महिला,आरोग्य कर्मचारी मोरया मित्र मंडळ संस्थापक केदार मारणे, अध्यक्ष अथर्व भरम, खजिनदार गणेश गायकवाड, आशितोश भरम, रोहिदास जाधव, आशिष गाडे आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.