अजितदादांच्या इफ्तार पार्टीतील इशाऱ्याच्या वक्तव्यावर फडणवीसांचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर आपली सहमती दर्शवली

0

राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून वाद उफाळला असताना मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करत मुस्लिम समाजाला धीर देण्याचे काम केलं आहे.तसेच आपण समाजाबरोबर असून जो कोणी डोळे वटारून पाहण्याचा प्रयत्न करेल त्याला सोडणार नाही, असा इशारा दिला आहे. यावरून राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर आपली सहमती दर्शवली आहे. तर मुस्लिम समाजाकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर आपणही सोडणार नाही, असे म्हटलं आहे. पण यावेळी त्यांनी नागपूर दंगलीत ज्यांचा हात होता त्यांनाही सोडणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार 

राज्यात मागील काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून वाद उफाळला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कबर हटवण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने केली आहेत. पण नागपूरमध्ये हिंसाचाराची ठिणगी पडली. यामुळे राज्यातील सध्याचे वातावरण तणावाचे बनले आहे. कबरीवरून मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे इफ्तार पार्टीचे आयोजन करत नवा संदेश दिला. यावेळी अजित पवार यांनी, मुस्लीम समुदायाला धमकी देण्याचा किंवा कोणी डोळे वटारून पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही, असा इशारा दिला.

आता याच इशाऱ्यावरून राजकीय टीका सुरू झाली असून भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे. त्यांनी अजित पवारांनी डोळे तपासणाच्या नवीन व्यवसाय सुरू केला वाटतं, असा टोला लगावला होता. यावरून आता महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली

फडणवीस यांनी, अजित पवार यांनी, इफ्तार पार्टीत काय वक्तव्य केलं आहे. कोणता इशारा दिलाय ते मला माहित नाही. पण आपल्याकडे चांगलं काम करणारा कोणीही असो. मग तो मुस्लिम असो किंवा आणखी कोणाही. अशा देशभक्त व्यक्तीला जर कोणी त्रास दिला तर त्याला आम्हीही सोडणार नाही. पण दोषी आढळणाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. मग तो कोणत्याही जाती किंवा धर्माचा असो. देशभक्त व्यक्तींना त्रास देणाऱ्याला आम्ही सोडणार नाही, असे म्हटलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी, मुस्लीम समुदायाला रमजानच्या शुभेच्छा देताना, आपला देश विविधतेत एकतेचे प्रतिक आहे. यामुळे मुस्लीम समाजाने विभाजनवादी शक्तींच्या जाळ्यात अडकू नये. मी तुमचा बंधू म्हणून समाजाच्या पाठिशी आहे. त्यामुळे कोणी मुस्लीम बांधव आणि भगिनींना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही, असे म्हटलं होतं.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार