रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

0
152

रुणवाल पॅनोरमा सोसायटीतील सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने सांस्कृतिक  कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी राजेंद्र वाघ यांनी विविध कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. निर्भय, आज ,श्रमिकांचं गोंदण, भिजू पावसात, विठोबाचा गजर, अशा अनेक प्रकारच्या  प्रेरणादायी कविता सादर केल्या.

रुणवाल पॅनोरमा फेडरेशनचे  हे २४ वे वर्ष असून सुरुवातीपासूनच सोसायटीत एकत्र कुटुंबाप्रमाणे सलोख्याचे वातावरण असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येतो.

पदाधिकारी देवेंद्र सोरटे, राजेश भाटे, संदीप निंबाळकर, सुदेश नागपुरे, रेवणीनाथ ढमाले, मच्छिंद्र तळेकर, संपत खेमणार, सत्तार पटवे आणि समिती यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोसायटीमधील सदनिका धारक आणि महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार