रक्षाबंधन 2025 नक्की कधी? कन्फ्यूजन आजच दूर करा  8 की 9 ऑगस्ट नेमका शुभ दिवस, शुभ मुहूर्त, अचुक तिथी

0
19

 

रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणींमधील प्रेमाचे प्रतीक आहे. दरवर्षी हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाचा सण हा भाऊ-बहिणींना प्रेमाच्या बंधनात बांधतो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर टिळा लावतात, औक्षण करून त्यांच्या मनगटावर राखी बांधतात. बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात. प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी हा दिवस खूप खास असतो.

लवकरच राखी पौर्णिमा येत असून यंदा म्हणजेच 2025 मध्ये रक्षा बंधन नेमकं कधी आहे याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. राखीचा सण 8 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल की 9 ऑगस्ट रोजी, याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. चला मग नेमका दिवस, शुभ मुहूर्त, तिथी सगळंच जाणून घेऊया…..

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

रक्षाबंधन 2025 तिथी 

रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी श्रावणातील पौर्णिमा शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 रोजी 02 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल. पौर्णिमेची तिथी 9 ऑगस्ट 2025, शनिवारी दुपारी 01 वाजून 24 मिनिटांनी संपेल. म्हणूनच रक्षाबंधन 9 ऑगस्ट, शनिवारी साजरे केले जाईल.

रक्षाबंधनाची विधी वेळ – सकाळी 05:47 ते दुपारी 01: 24 पर्यंत असेल.

भद्र काळ

रक्षाबंधनाच्या दिवशी भद्र काळाच्या वेळी राखी बांधली जात नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी भद्र काळ शुभ नसतो. म्हणून, या दिवशी अशुभ वेळी राखी बांधण्याची चूक टाळावी.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावतात, औक्षण करतात आणि उजव्या हातावर राखी बांधतात. तसेच त्यांना मिठाई देखीव भरवतात, एखादे छानसे गिफ्टही आजकाल दिले जाते. त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला भेटवस्तू देतो. रक्षाबंधन हा एक असा पवित्र सण आहे जो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याला पूर्ण आदर आणि सन्मान देतो.