राज्यात गेल्या काही दिवसांपासून सक्रीय असणारा पाऊस ब्रेक घेणार आहेत. राज्यातील काही भागांत तुरळक ते मध्यम पाऊस पडणार आहे. परंतु संपूर्ण राज्यातून मोठा पाऊस ब्रेक घेणार आहे. 17 जुलैपर्यंत पाऊस सुटीवर जाणार आहे. तसेच 20 जुलैनंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप घेतली आहे.






पाऊस का घेणार ब्रेक?
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 17 जुलैपर्यंत पाऊस नसणार आहे. त्यानंतर जुलैच्या तिसर्या आठवड्यापासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. सध्या अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे मान्सून वारे कमकुवत झाले आहे. मान्सूनच्या पश्चिमी टोकाचेही काहीसे उत्तरेकडे सरकला आहे. बंगालच्या उपसागरात हवेचा दाब जुलै महिन्याच्या तिसर्या आठवड्यात अनुकूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. राज्यात चार दिवस ऑरेंज आणि रेल अलर्ट कुठेही दिला नाही.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस
अंदामान निकोबार अन् केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल झाला होता. त्यानंतर राज्यात यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला. मे महिन्यात मान्सूपूर्व जोरदार पाऊस झाला होता. जून महिन्यात मराठवाडा, विदर्भ वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा वाढला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावासाने ओढ घेतला. परंतु जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्र पाऊस झाला. विदर्भात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील सर्व भागांत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. आता काही दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्या देखील झाल्या आहेत. राज्यात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाच्या ब्रेक कालावधीत मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. राज्यात यंदा गत वर्षीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. यंदा 2 लाख 78 हजार 345 हेक्टर क्षेत्रावर अधिक पेरा झाला आहे. गेल्या वर्षी 1,94,827 हेक्टरवर पेरणी झाली होती.











