गुहागर दि. ८ (रामदास धो. गमरे) वर्षा ऋतूतील मुसळधार पावसामुळे व त्यातून निर्माण होणारी पूरपरिस्थिती, नैसर्गिक आपत्ती व निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे भिक्खू संघास बाहेर फिरणे शक्य नसल्याने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या कालावधीत भगवान बुद्धांच्या आदेशानुसार एका ठिकाणी किंवा बुद्धविहारात राहून ध्यानसाधना, चिंतन, मनन, प्रवचन याद्वारे धम्मप्रचार व धम्मप्रसार करण्यास सुरुवात केली भगवान बुद्धांच्या याच मार्गदर्शनानुसारच बौद्धजन सहकारी संघ ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी गाव-मुंबई शाखा व संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत प्रत्येक रविवारी वर्षावास प्रवचन मालिकाचे आयोजन करण्यात आले आहे.






सदर वर्षावास प्रवचन मालिकेचे आरंभ तथा प्रथम पुष्प मुंबई शाखा अध्यक्ष सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रवचनकार – बौद्धाचार्य सुगंध कदम यांच्या “सुत्तपठण आणि परित्राण पाठाचे महत्व” या विषयाने रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ठीक ४:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुनी बी.डी.डी. चाळ, ३ अ व ४ अ च्या मध्ये, एस.एस.वाघ मार्ग, नायगाव, दादर (पू.) मुंबई येथे होणार आहे.
सदर प्रसंगी संस्कार समितीचे अध्यक्ष संदीप गमरे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थितांचे स्वागत करतील, तर संघाचे सरचिटणीस संदेश गमरे व संस्कार समितीचे चिटणीस सचिन मोहिते हे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळतील. तसेच प्रमुख विश्वस्त सिद्धार्थ पवार, माजी प्रमुख विश्वस्त संजय पवार, माजी विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, एस. बी. जाधव, के. सी. जाधव, विश्वस्त दीपक जाधव, पांडुरंग गमरे, माजी कार्याध्यक्ष संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे व मुंबई शाखा कार्याध्यक्ष दीपक मोहिते, उपकार्याध्यक्ष अशोक कदम, चिटणीस अजय जाधव, संदेश जाधव, कोषाध्यक्ष प्रदीप कदम, न्यायदान कमिटी अध्यक्ष संजय पवार, विवाह मंडळ अध्यक्ष धम्मवर्धन तांबे, शिक्षण कमिटी अध्यक्ष संजीवन यादव, माजी सरचिटणीस संजय तांबे, सदस्य उत्तम जाधव, अमित पवार, सुरेश गमरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्व विभाग अधिकारी, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती पदाधिकारी, सर्व उपसमित्या त्यांचे पदाधिकारी, सदस्य, महिला मंडळ, उपासक, उपासिका यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून धम्म कार्यास सहकार्य करावे अशी विनंती बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केली आहे.










