सुनेचा छळ : हांडेवाडी रोडवरील आयटी कर्मचाऱी महिलेची आत्महत्या

0
1

हांडेवाडी रोडवरील सातवनगरमध्ये राहणाऱ्या २९ वर्षीय आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपिका प्रमोद जाधव असे मृत महिलेचे नाव असून, सासरकडील छळ व हुंड्याची मागणी हे कारण तिच्या आत्महत्येमागे असल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.

ही घटना २० जून रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दीपिकाचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास, तसेच हुंड्यासाठी दबाव टाकला जात होता, अशी तक्रार तिच्या पालकांनी केली आहे.

दीपिकाच्या सासूबाईंनी तिला मारहाण करत मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तपास सुरू केला असून, काळेपडळ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ व ८५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आत्महत्येचे विचार येत असतील, तर मदत मिळवणं महत्वाचं आहे
‘Connecting’ ही पुणेस्थित स्वयंसेवी संस्था भावनिक तणावातून जात असलेल्या व्यक्तींना माइंडफुल अ‍ॅक्टिव्ह लिसनिंग तत्त्वज्ञानावर आधारित मदत पुरवते.

📞 हेल्पलाइन क्रमांक: 1800-209-4353 (टोल फ्री) / 9922001122
🕐 वेळ: दररोज दुपारी १२ ते रात्री ८
🏥 वॉक-इन सुविधा: सोमवारी ते शनिवारी, दुपारी १२ ते संध्याकाळी ५
📧 ईमेल: connectingngo@gmail.com

तुमचं आयुष्य अमूल्य आहे. मदत मागण्यास कधीही संकोच करू नका.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर