टोणी दा ढाब्यावर जमावाचा हल्ला; पोलिसांवर दुर्लक्षाचे आरोप

0

कामशेतमधील प्रसिद्ध टोणी दा ढाबा येथे सुमारे १५० जणांच्या जमावाने थेट हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात महिला कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आणि मालमत्तेची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

ढाब्याचे मालक सिद्देश विजयकुमार चावला यांनी गंभीर आरोप केले असून, कामशेत पोलिसांनी हल्लेखोरांना पाठीशी घातले असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असेही सांगितले की, हे पहिलेच प्रकरण नाही, आधीही तीन वेळा अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत, परंतु पोलिसांनी काहीही ठोस कारवाई केली नाही.

मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जमाव कॅमेरे फोडताना आणि ढाब्यात तोडफोड करताना स्पष्ट दिसत आहे. सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे, या घटनेच्या वेळी ग्रामीण पोलिस घटनास्थळी उपस्थित असतानाही त्यांनी हस्तक्षेप केला नाही.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

संपूर्ण घटनेनंतर ढाब्याचे कर्मचारी आणि मालक दोषींवर कारवाई व पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करत आहेत.