“ते मला नोबेल पुरस्कार देणार नाहीत कारण…” ट्रम्प यांचा दावा; पाकिस्तानकडून शांततेच्या नोबेलसाठी शिफारस

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळवण्याचा दावा करत वाद निर्माण केला आहे. पाकिस्तानने ट्रम्प यांची २०२६ सालच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी अधिकृत शिफारस केल्यानंतर ट्रम्प यांनी म्हटले, “मी आतापर्यंत चार–पाच वेळा हा पुरस्कार जिंकायला हवा होता, पण ते मला देणार नाहीत… कारण ते फक्त लिबरल लोकांनाच देतात.”

“रवांडा, काँगो, सर्बिया-कोसोवो आणि विशेषतः भारत-पाकिस्तान यांच्यात मी शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावली,” असा दावा ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, “भारत-पाकिस्तान दरम्यानच्या अलीकडील संघर्ष काळात ट्रम्प यांची निर्णायक राजनैतिक हस्तक्षेप व नेतृत्व भूमिका होती. त्यामुळे २०२६ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार दिला जावा.”

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

भारताचा स्पष्ट नकार
ट्रम्प यांचा दावा असूनही, भारतीय सरकारने त्यांच्या शांततेतल्या भूमिकेचा वारंवार इन्कार केला आहे. भारताने ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाचे महत्त्व पूर्वीपासूनच नाकारले आहे.

ट्रम्प यांचा नवीन दावा – रवांडा-काँगो शांतता करार
ट्रम्प यांनी यावेळी असेही सूचित केले की, कॉंगो आणि रवांडा यांच्यातील दीर्घकालीन संघर्ष थांबवण्यासाठी सोमवारी एक शांतता करार साइन होणार आहे, आणि त्यामध्येही त्यांची भूमिका निर्णायक असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या कराराची अधिकृत पुष्टी किंवा अमेरिका त्यात सहभागी असल्याचा स्वतंत्र पुरावा अद्याप उपलब्ध नाही.

याआधीही नोबेलसाठी नाव सुचवले गेले
ट्रम्प यांना यापूर्वीही नोबेल शांतता पुरस्कारासाठी अनेक वेळा नामांकन मिळाले होते, विशेषतः इस्रायल आणि काही अरब देशांमधील ‘अ‍ॅब्राहम करार’ घडवून आणल्याबद्दल. मात्र, अद्याप त्यांना हा पुरस्कार मिळालेला नाही. नोबेल शांतता पुरस्कार नॉर्वेतील नोबेल समिती दरवर्षी प्रदान करते, आणि त्यांनी ट्रम्प यांच्या उमेदवारीवर कधीही थेट टिप्पणी केली नाही.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा