जगातील पहिलं अलौकिक हिंदू मंदिर तेलंगणामध्ये होतंय तयार…

0
1

तेलंगणामध्ये एक नवीन हिंदू मंदिर उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे मंदिर बांधून नाही, तर थ्री-डी प्रिंट करून तयार करण्यात येणार आहे. अशा प्रकारे उभारण्यात आलेलं हे जगातील पहिलंच मंदिर असणार आहे. अप्सुजा इन्फ्राटेकने यासाठी सिम्पलीफोर्ज क्रिएशन्स या 3D प्रिंटिंग बांधकाम कंपनीशी करार केला आहे. सिद्धीपेटमधील बुरुगपल्ली येथे असणाऱ्या चारविथा मेडोसमध्ये हे मंदिर असेल. एकूण ३,८०० स्क्वेअर फूट परिसरात हे मंदिर उभारण्यात येणार आहे. यामध्ये तीन भाग असणार आहेत.

अप्सुजा इन्फ्राटेकचे एमडी हरी कृष्णा जीदीपल्ली यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, “या मंदिराला तीन गर्भगृहे असणार आहेत. या तिघांचा आकार वेगवेगळा असेल. पहिलं गर्भगृह हे भगवान शंकराचे असेल. हे गर्भगृह चौकोनी आकाराचे असेल. त्यानंतर मोदकाच्या आकाराचे गर्भगृह भगवान गणपती साठी असेल. तर, कमळाच्या आकाराच्या गर्भगृहात देवी पार्वतीची स्थापना केली जाईल.”

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

थ्री-डी प्रिंटेड पूल

मार्चमध्ये सिम्पलीफोर्ज क्रिएशन आणि आयआयटी हैदराबाद यांनी एकत्र मिळून एक थ्री-डी प्रिंटेड पूल तयार केला होता. हा भारतातील पहिला प्रोटोटाईप 3D प्रिंटेड पूल होता. या पुलाची चाचणी केल्यानंतर आता मंदिराबाहेरील गार्डनमध्ये पादचारी पूल म्हणून याचा वापर करण्यात येतो आहे. सिम्पलीफोर्ज क्रिएशनचे सीईओ ध्रुव गांधी यांनी याबाबत माहिती दिली.

दोन गर्भालये पूर्ण

याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या गर्भगृहांपैकी शिवालय आणि मोदकाच्या आकाराचे गर्भगृह यांचं प्रिंटिंग पूर्ण झालं आहे. सध्या कमळाच्या आकाराचं गर्भगृह आणि गोपुरम यांचं प्रिंटिंग सुरू असल्याचं जीदीपल्ली यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

3D तंत्रज्ञानाचा फायदा

“मोदक आकाराचं गर्भगृह बनवणं हे खरंतर मोठं आव्हान होतं. मात्र, आम्ही दहा दिवसांच्या कालावधीत अवघ्या सहा तासांमध्ये ते बांधून पूर्ण केलं. यानंतर आता कमळाच्या आकाराचं गर्भगृह हे आणखी लवकर पूर्ण होईल अशी आशा आहे.” असं ध्रुव गांधी म्हणाले. “सामान्यपणे अशा आकारांचं बांधकाम करणं हे खूप अवघड असतं. मात्र, थ्रीडी तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा प्रकारचे विविध आकार बनवणं अगदी सोपं जात आहे.” असंही गांधी म्हणाले.