पुणे पोटनिवडणुक अगोदरच मविआत जुंपली; दावा कुणाचा? जागा रिक्तचा अहवाल सादर

0
2

पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर त्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होईल की नाही याबाबत साशंकता आहे. जवळपास एक वर्ष लोकसभा निवडणुकीसाठीचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे पोटनिवडणूक जाहीर होईल की नाही याबाबत स्पष्टता नसली तरी पुण्याचे खासदार होण्याकरिता अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहे. त्यासाठी आता भाजपकडून अनेकांनी उमेदवारी मिळावी याकरिता प्रयत्न सुरू केले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जागेवर दावा केला जात आहे. त्यात ही जागा कुणाला मिळणार यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

एकीकडे पुणे लोकसभा पोटनिवडणूकीच्या उमेदवारीवरून भाजपात खल सुरू आहे. भाजपकडून गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे अशी तीन नावं चर्चेत आहे. तर महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकरांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.

पुणे लोकसभेची जागा रिक्त झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून सादर नुकताच सादर करण्यात आला असून पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसकडून दावा केला जात आहे. पोटनिवडणुक जाहीर झाल्यावर काँग्रेस या मतदारसंघातुन निवडणूक लढवणार असल्याचे कॉंग्रेसकडून सांगण्यात आला आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादीला दिली जाणार नाही, पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी याबाबत माहिती दिली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कसब्यात कॉंग्रेसला मदत केल्याचा दाखला दिला जात आहे.

पुणे लोकसभा मतदार संघाची जागा कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसला द्यावी अशी मागणी केली जात असून प्रशांत जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्याबाबत कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी याबाबत पक्षातील नेटयांकडे तशी मागणीही सुरू केली आहे. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बाबत दुजोरा दिला आहे.

जयंत पाटील यांनी ही जागा जर महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडली तर प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे मागणी करू असे म्हंटले होते. त्यावरून आता पोटनिवडणुकीची जागा मिळवण्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे