मलेशियाच्या ओओ सोलरिया टूरमध्ये डीएसपीने गाजवलं! 

0
2
रॉकस्टार DSP च्या Oo Solriya टूरला चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद ! 
Rockstar DSP ची बहुप्रतिक्षित Oo Solriya टूर नुकतीच पार पडली. त्याचा चाहत्यांनी या अनोख्या टूर ला अद्भुत प्रतिसाद दिला.या दौऱ्यात सहभागी झालेल्या चाहत्यांनी अनोखा अनुभव शेयर केला आहे.
मलेशियातील चाहत्यांनी मलेशियात रॉकस्टार डीएसपीच्या बीट्सवर फक्त धमाल आणि धमाल केली. गाणी आणि लोकांचे पाय एकसाथ यात तल्लीन झाले ! वेगवेगळ्या वयोगटातील प्रेक्षकांसाठी रॉकस्टार डीएसपीचा मलेशिया दौरा सर्वात संस्मरणीय होता. रॉकस्टार डीएसपीला त्याच्या प्रेक्षकांचे मनोरंजन कसे करावे हे माहित आहे आणि त्याच्या संगीताची क्रेझ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.
इलेक्ट्रिक रात्रीच्या खास झलक ! 
हा व्हिडिओ एक वेगळी  ऊर्जा देऊन जातो अस सहजपणे म्हटलं जाऊ शकत !प्रेक्षकांनी या दौऱ्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे.
मनापासून कृतज्ञता व्यक्त करताना डीएसपी म्हणतात, “मलेशिया ओओ सोलरिया टूर ही अविस्मरणीय होती गाण्यांवर खूप प्रेम करणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं त्या बद्दल आभार !  प्रेक्षक खूप उत्साही होते.
संगीत नेहमीच हृदयाशी जोडलेले असते आणि म्हणूनच ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. जगभरातून सतत प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. डीएसपीकडे पुष्पा 2, सुरिया 42 आणि आणखी बरेच काही प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये आहेत !
अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे