प्रभाग ११ची अनोखी नाळ: ‘राम’राज्य ‘चंद्र’छायेचे कदम अन् समाजसेवी वारश्याचे ‘हात’!

0
1

‘……कोथरूड!’ म्हटलं की एक वेगळीच कल्पना सर्वांचे मनात येते मग ती राजकीय असू द्या किंवा सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक! पुणे शहराचे राजकीय केंद्र म्हणून आज कोथरूडचा उदय होत असताना या भागातील नेतृत्वही तेवढे जिव्हाळ्याचं स्नेहाचा आणि समाजसेवी वारश्याच बनतय! वरकरणी पाहता उच्च-भ्रु सोसायटीचा भाग म्हणून कोथरूडची ओळख असली तरी कोथरूडच्या नसानसात कष्टकरी आणि राबणारे हातांचे जीर्ण वास्तव्य नाकारता येत नाही आणि याच जाज्वल सत्याचा हक्काचा आधार आणि जिव्हाळ्याची नाळ म्हटलं की एक नाव पुढे येते ते म्हणजे रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम! पुणे महापालिकेचे सभासद म्हणून ‘हॅट्रिक’ साजरी करणाऱ्या या नेतृत्वाने भक्कम हाताने फक्त समाजसेवी वारसा जतन केला आहे. म्हणूनच आज प्रभागाची अनोखी नाळ रामराज्य विचाराचे आणि चंद्रछायेची शितलता देणारे भक्कम समाजसेवी वारशाचे ‘हात’ म्हणून अँड. चंदूशेठ कदम यांच्याकडेच पाहिले जाते. अशा या अवलिया व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

कोथरूड भागामध्ये माजी नगरसेवक कै. सुबराव कदम यांनी काँग्रेस विचाराची जी स्नेहवेल लावली होती त्या विचारांची जपणूक करत काँग्रेस विचाराचे जतन करून कठीण परिस्थितीमध्ये याच विचाराची वाढ करण्यासाठी अहोरात्र जनसेवेच्या व्रतामध्ये गुंतलेले हात म्हणून रामचंद्र कदम यांच्याकडे पाहिले जाते. कितीही कठीण परिस्थिती असली तरी सुद्धा कार्यकर्त्यांवर चंद्रछाया निर्माण करणे आणि जनसामान्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी रामराज्य संकल्पनेचे जनजीवन बनवण्यासाठी काँग्रेस विचारांची जोड घेऊन प्रभाग 11 मधील सुतारदरा किष्किंधानगर जयभवानीनगर म्हातोबानगर व केळेवाडी या वस्ती विभागातील नागरिकांसाठी विभिन्न योजना आणि या भागातील मुलींचे आणि तरुणांचे प्रश्न शैक्षणिक समस्या आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस विचारांच्या जीवावर काम करत नगरसेवक आणि नागरिक यांची वेगळीच नाळ निर्माण झाली आहे. राजकीय दृष्ट्या सर्वच पक्षांनी या भागावर आपली पकड मिळवण्यासाठी आज अतोनात प्रयत्न केले आहेत, करत आहेत…. तरीही नागरिक आणि लोकप्रतिनिधींची अनोखी नाळ आजवर वृद्धिंगतच होत जाणे हे चंदूशेठ कदम यांच्या कार्याची पावती मानावी लागेल.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूक कोणतीही असो ‘हॅट्रिक’ नगरसेवक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य रामचंद्र उर्फ चंदुशेठ कदम यांचा दृढसंकल्प काँग्रेस पक्षाचे विचार आणि प्रचार करण्यासाठी कायमच फायद्याचे झाले असून कोथरूड विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या वेळी अत्यंत कठीण परिस्थितीत चंदुशेठ कदम यांनी विरोधी पक्षातून प्रबळ स्थानिक उमेदवार असतानाही उत्साहवर्धक आणि समाधानकारक वातावरण बनवण्यात यश मिळवलं होतं. पुणे महापालिका काँग्रेस नगरसेवक म्हणून गेली 15 वर्षे नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी काम करत आहेत. प्रभाग ११मध्ये एक आश्वासक चेहरा आज ॲड. चंदूशेठ कदम यांच्याकडे पाहिले जात असून वस्ती विभागात आजवर केलेली कामे हीच त्यांची जमेची ठरणार आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

सध्या राजकीय विरोधकांकडून हाच अभेद गड भेदण्यासाठी जंग जंग पछाडले जात असले तरीसुद्धा 2 दशकांची घट्ट विणलेली ही नाळ जराही क्षीण न होणे ही खरी विचारांची आणि स्नेहबंधाची ताकद आहे. यंदाची लढाई सर्वात बिकट असे चित्र निर्माण केले जात असले तरीसुद्धा भक्कम पुरोगामी विचारांची बांधणी असलेल्या या नेतृत्वाला मात्र आपल्या मतदारांवर प्रचंड प्रचंड विश्वास असून पुन्हा सेवेची संधी मिळण्याचीही खात्री आहे.