पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ १० लाखांचा सहभाग; मुख्यमंत्र्यांसह 5 लाख वारकरी करणार ही दिव्य साधना!

0

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २१ जून रोजी पुण्यात मुक्कामी आहेत. याच दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लाखो वारकरी, विद्यार्थी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नागरिक योगासने करणार आहेत. या उपक्रमात सुमारे १० लाख जण सहभागी होतील, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

महाराष्ट्र सरकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, राष्ट्रीय सेवा योजना, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र देहू, विद्यार्थी विकास मंचातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत आज (ता. १६) ही माहिती देण्यात आली. पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य देविदास वायदंडे, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. धोंडिराम पवार, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी उपस्थित होते.

जागतिक योग दिनाच्या दिवशी पालख्या पुण्यात मुक्कामी असणार आहेत. मुख्य कार्यक्रम पुणे विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी ८ वाजता होणार आहे. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होईल. या उपक्रमात शहरात सुमारे पाच लाख वारकरी, पुणेकर सहभागी होतील. या उपक्रमात शहरातील २०० हून अधिक महाविद्यालये, २५ विद्यापीठे, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असे श्री. पांडे यांनी सांगितले. या उपक्रमात मदत करण्यासाठी प्रत्येक दिंडीसोबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे एक पथक सोबत असणार आहे, असे पांडे यांनी सांगितले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

स्वयंसेवकांनी नोंदणी करावी

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी, रासेयो कार्यक्रम अधिकारी आणि प्रत्येक दिंडीमध्ये सहभागी होणारे किमान २० विद्यार्थी, स्वयंसेवकांची नावनोंदणी करावी. ही नोंदणी https://bcud.unipune.ac.in/NSS/NSS_Registration/Bhaktiyog_Registration.aspx या लिंकवर करावी, त्यामुळे सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र, टोपी व टि-शर्ट देता येतील असे पांडे यांनी सांगितले.