लग्नाच्या आमिषाने पुण्यातील NGO कार्यकर्तीची ८.४ लाखांची फसवणूक – सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल

0
1

लग्नाचे आमिष दाखवून एका २८ वर्षीय महिला NGO कार्यकर्तीची तब्बल ८.४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित महिला घटस्फोटित असून ती एका नामांकित मॅट्रिमोनियल वेबसाइटवर पुन्हा विवाहासाठी प्रोफाईल तयार करून सक्रिय होती. तिच्या भावनांशी खेळत एका फसवणूक करणाऱ्या टोळीने अत्यंत योजनाबद्ध आणि गुंतागुंतीच्या पद्धतीने ही लूट केली.

एप्रिल महिन्यात पीडित महिलेला ‘लंडनस्थित एनआरआय व रिअल इस्टेट व्यावसायिक’ असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीशी संपर्क झाला. त्याने सुरुवातीला आपली ओळख “प्रामाणिक, शिक्षित, प्रतिष्ठित” अशी दिली. नियमित संभाषणातून दोघांमध्ये ओळख वाढली आणि विश्वास बसू लागला.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

थोड्याच दिवसात आरोपीने लग्नासाठी भारतात येण्याची तयारी असल्याचे सांगितले. आपल्या भारतभेटीचे खोटे पुरावे – हवाई तिकीट, व्हिसा तपशील इत्यादी महिला पाठवले. पीडित महिलेला वाटले की ही भेट त्यांच्या नात्याचा पुढचा टप्पा ठरणार आहे.

३० एप्रिल रोजी महिलेला ‘दिल्ली विमानतळावरून’ एका अधिकाऱ्याचा कॉल आला. त्या कथित अधिकाऱ्याने सांगितले की, लंडनहून आलेला NRI प्रवासी ७३,००० पाउंड रोख घेऊन आल्यामुळे कस्टममध्ये अडवला गेला आहे, आणि त्याला सोडवण्यासाठी ३५,००० रुपये भरावे लागतील.

सुरुवातीला गोंधळलेली महिलेने आरोपीच्या विनंत्यांवर विश्वास ठेवून ती रक्कम पाठवली. मात्र तिथून फसवणुकीचा सापळा अधिकच गुंतागुंतीचा होत गेला आणि पुढील काही दिवसात कधी कोर्टाच्या शुल्काच्या नावाखाली, कधी डॉक्टरांच्या उपचार खर्चासाठी, कधी कथित विमानतळाचा दंड, तर कधी मालमत्तेच्या नुकसानभरपाईच्या नावाखाली अशा विविध बनावट कारणांनी महिला वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करत राहिली.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

फसवणुकीच्या दरम्यान पीडित महिलेने स्वतःचे सोनं विकलं, मित्रांकडून पैसे उधार घेतले आणि एप्रिल ते जून या दोन महिन्यांच्या कालावधीत एकूण ८.४ लाख रकमेचा व्यवहार केला. सततच्या पैशाच्या मागण्यांमुळे आणि कोणताही प्रत्यक्ष संपर्क न झाल्यामुळे महिलेच्या मनात शंका आली. तीने आरोपीशी संपर्क तोडला आणि पुणे सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली.

सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून बँक खात्यांचे तपशील, कॉल रेकॉर्ड्स, ईमेल आयडी व IP अ‍ॅड्रेस तपासायला सुरुवात केली आहे. पोलिसांना अंदाज आहे की, ही फसवणूक मोठ्या राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय सायबर टोळीने केली असावी.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर