महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना ‘गृहमंत्री उत्कृष्ट तपास पदक’ जाहीर

0

गेल्या वर्षभरात गुन्हे तपासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे ‘गृहमंत्री उत्कृष्ट तपास पदक २०२२’ प्रदान करण्यात आले. या पदक वितरण समारंभाचे आयोजन शुक्रवार, १३ जून रोजी पुण्यातील पोलीस संशोधन केंद्रात करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

२०१८ ते २०२२ या काळात महाराष्ट्रातील एकूण ५४ अधिकाऱ्यांना या सन्मानाने गौरवण्यात आले आहे. या वर्षी निवडले गेलेल्या अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वामध्ये राजकीय हत्या, अपहरण, बलात्कार, बनावट लसीकरण घोटाळा, बँक दरोडा, अमलीपदार्थ जप्ती, आणि आर्थिक गुन्ह्यांचा तपास अशा गंभीर प्रकरणांचा यशस्वी तपास समाविष्ट आहे.

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीसांनी 25 किलो वजन 56व्या वर्षी कसं कमी केलं? त्यांच्या फिटनेसच्या सहज सुलभ गोष्टी सर्वांना शक्य 

उल्लेखनीय सन्मानप्राप्त अधिकारी आणि त्यांची कामगिरी:

  1. कृष्णकांत उपाध्याय – उपायुक्त, मुंबई शहर: विधानसभा निवडणुकीच्या काळात झालेल्या ग्रामसेवकाच्या राजकीय हत्येचा यशस्वी तपास. आरोपींना जन्मठेप.
  2. प्रमोद तोरडमल – वरिष्ठ निरीक्षक, कुर्ला पोलीस ठाणे: पूलाखाली सापडलेल्या अज्ञात शवाची ओळख पटवून २० दिवसांत गुन्हा उघडकीस.
  3. मनोज पवार – सहाय्यक निरीक्षक, मांद्रूप पोलीस ठाणे, सोलापूर: अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरण व खून प्रकरणात आरोपीस मृत्युदंड.
  4. दिलीप पवार – निरीक्षक, सुरक्षा शाखा, कोल्हापूर: ६६.७७ लाखांच्या घरफोडीचा तपास करून ७ दिवसांत २० आरोपींना अटक.
  5. अशोक विरकर – पोलीस अधीक्षक, एटीएस, मुंबई: अल्पवयीन मुलाकडून बलात्कार व खून प्रकरणाचा उलगडा, १२ वर्षांची शिक्षा.
  6. अजित पाटील – उपविभागीय अधिकारी, कर्माळा, सोलापूर: किरकोळ वादातून महिलेच्या खून प्रकरणात तांत्रिक पुरावे वापरून ५ आरोपींना अटक.
  7. राणी काळे – सहाय्यक निरीक्षक, मुख्य गुप्तचर अधिकारी, रागुवी, कोकण: पनवेल-अलिबाग मार्गावर ३७७ किलो गांजाची जप्ती, आरोपींना १३ वर्षांची शिक्षा.
  8. दीपशिखा वारे – निरीक्षक, खेऱवाडी पोलीस ठाणे, मुंबई: कोविड लसीकरण घोटाळ्याचा पर्दाफाश; ११ आरोपींना अटक.
  9. सुरेशकुमार राऊत – उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, लातूर: सशस्त्र बँक दरोड्यातील २.५१ कोटी रुपयांची वसुली, सर्व आरोपी अटकेत.
  10. जितेंद्र वांकोटी – वरिष्ठ निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे, मीरा-भाईंदर: १.५४ कोटींच्या दागिन्यांच्या दिवसा झालेल्या दरोड्याचा उलगडा.
  11. समीर अहिरराव – निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट २, मीरा-भाईंदर: नालासोपारा येथे सराफाच्या हत्येप्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक.
अधिक वाचा  दुसरी पसंती ठरवणार पुण्याचा शिक्षक आमदार, नेमकं गणित काय? निकालाआधीच सोप्या शब्दात समजून घ्या